आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारतीय संघाने जिंकले रौप्य पदक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२२ । फलटण । डब्लिन, आयर्लंड येथे दि. १९ ते २६ जून दरम्यान संपन्न झालेल्या ५ व्या आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने रौप्य पदक जिंकले, या स्पर्धेतील भारतीय संघाची कर्णधार वैष्णवी फाळके आणि संघातील अन्य खेळाडू अश्विनी कोळेकर, ऋतुजा पिसाळ व काजल आटपाडकर यांचे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर हॉकी महाराष्ट्र संघटना सचिव मनोज भोरे, रोहन जावळे, रोहित कारखानीस यांनी स्वागत केले.
कर्णधार वैष्णवी फाळके, ऋतुजा पिसाळ या फलटण तालुक्यातील तर अश्विनी कोळेकर व काजल आटपाडकर या माण तालुक्यातील आहेत. या यशाबद्दल त्यांचे संपूर्ण सातारा जिल्ह्यातून अभिनंदन होत आहे.

फोटो : पुणे आंतरराष्ट्रीय विमान तळावर उजवी कडून रोहित जावळे कु. ऋतुजा पिसाळ, कु. अश्विनी कोळेकर, कु. वैष्णवी फाळके आणि रोहित कारखानीस.


Back to top button
Don`t copy text!