आठवड्याच्या सुरुवातीला भारतीय शेअर बाजारात घट

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


निफ्टी ०.६८ टक्क्यांनी तर सेन्सेक्स २०९.७५ अंकांनी खाली घसरला

स्थैर्य, मुंबई, 29 : माहिती तंत्रत्रान, धातू आणि वाहन तसेच बँकिंग क्षेत्रांच्या घसरणीमुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच भारतीय बाजारातील निर्देशांकांनी व्यापारी सत्रात घट दर्शवली. निफ्टीने १० हजारांची पातळी सोडली नसली तरीही तो ०.६८% नी घसरला किंवा ७०.६० अंकांनी घसरून १०,३१३.४० वर स्थिरावला. तर दुसरीकडे एसअँडपी बीएसई सेन्सेक्सने ०.६०% किंवा २०९.७५ अंकांची घसरण घेत ३४,९६१.५२ वर विश्रांती घेतली.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या सत्रात १५९७ शेअर्स घसरले, ११३५ शेअर्सनी नफा कमावला तर १३६ शेअर्स स्थिर राहिले. एचडीएफसी बँक (१.८०%०), एचयूएल (१.२२%), ब्रिटानिया इंडस्ट्रीज (२.१३%), सिपला (१.४३%) आणि एमअँडएम (०.७४%) हे आजच्या व्यापारी सत्रातील टॉप निफ्टी गेनर्स ठरले. तर कोल इंडिया (४.९६%), अॅक्सिस बँक (४.७०%), टेक महिंद्रा (३.१८%), हिंडाल्को इंडस्ट्रीज (३.१४%) आणि एसबीआय (२.७९%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. एफएमसीजी वगळता सर्वच सेक्टर्सनी घट दर्शवली. बीएसई मिडकॅप १.३९% नी तर बीएसई स्मॉलकॅप १.२३% नी घसरला.

जिओसंबंधी प्रवाहाने स्पॉट किंमतीत वाढ दर्शवल्याने आज भारतीय रुपयादेखील वधारला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आज भारतीय रुपयाने ७५.४० ते ७५.७५ रुपयांदरम्यान व्यापार केला.

जागतिक बाजारात युरोपियन बाजार वगळता सर्वांनी कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे कमकुवत व्यापार दर्शवला. युरोपिय बाजाराने या खंडात तत्काळ आर्थिक सुधारणेची आशा दर्शवत वृद्धी घेतली. नॅसडॅक २.५९ %, निक्केई २२५ नी २.३०% आणि हँग सेंगने १.०१% ची घट दर्शवली. तर दुसरीकडे  एफटीएसई एमआयबी आणि एफटीएसई १०० चे शेअर्स अनुक्रमे ०.६१% आणि ०.२५% नी वधारले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!