भारतीय निर्देशांक निचांकी स्थितीत; निफ्टी ८ अंकांनी तर सेन्सेक्स ८० अंकांनी घसरला

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, मुंबई, दि.8: आजच्या दिवसातएमएमसीजी, आयटी व फार्मा सेगमेंटमध्ये घसरण झाल्याने बेंचमार्क निर्देशांकांनी निचांकी स्थिती दर्शवली. निफ्टी ०.०६% किंवा ८.९० अंकांनी घसरला व तो १४,१३७.३५ वर स्थिरावला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.१७% किंवा ८०. ७४ अंकांनी घसरला व तो ४८,०९३.३२ वर स्थिरावला. बेंचमार्क निर्देशांकांना मागे टाकतनिफ्टी स्मॉलकॅप १०० व निफ्टी मिडकॅप १०० हा १ % उच्चांकावर स्थिरावला.

एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की आजच्या व्यापारी सत्रात नेस्ले इंडिया (२.०४%), एचडीएफसी लाइफ इन्शुरन्स (१.८८%), हिंदुस्थान युनिलिव्हर (१.८३%), टायाटन कंपनी (१.८२%) आणि डिवीज लॅबोरेटरीज (१.८०%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले. याउलट टाटा स्टील (५.२८%), हिंडाल्को (४.८१%), भारती एअरटेल (३.५९%), अदानी पोर्ट्स (३.३५%) आणि इंडसइंड बँक (३.२६%) हे टॉप निफ्टी गेनर्समध्ये समाविष्ट झाले.

क्षेत्रीय पातळीवर, मेटल, रिअॅलिटी, पीएसयू बँक आणि वित्तीय स्टॉक्समध्ये खरेदी दिसून आली. बीएसई मिडकॅप आणि बीएसई स्मॉलकॅप अनुक्रमे १.०५% आणि ०.८५% नी वाढले.

डिक्सन टेक्नोलॉजीज (इंडिया) लि.: डिक्सन टेक्नोलॉजीच्या स्टॉक्समध्ये ९.६८% नी वाढ झाली व त्यांनी १५,८४३.९५ रुपयांवर व्यापार केला. कंपनीने ट्विन वायरलेस स्पीकर्स तयार करण्यासाठी बोट (boAt) बरोबर करार केला. ही उत्पादने डिक्सॉनच्या नोएडा मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये तयार केली जातील.

भारती एअरटेल लि.: या टेलिकॉम क्षेत्रातील दिग्गज कंपनीने पेमेंट बँकेत एफआयपीबी वाढवण्यासाठी आरबीआय आणि एफडीआयकडून मान्यता मिळवली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ३.५९% नी वाढले व त्यांनी ५४४.१५ रुपयांवर व्यापार केला.

जीएम ब्रेवरीज लि.: जीएम ब्रेवरीज लि. कंपनीने नुकतेच २०२१ आर्थिक वर्षातील तिसऱ्या तिमाहीत कमाई नोंदवली. कंपनीचा निव्वळ नफा ५१% ने वाढून तो २१.१ कोटी रुपये झाला. तर महसूलात ६.४% ची घट ११२.१ कोटी रुपयांपर्यंत झाली.

लुपिन लि.: लुपिनच्या स्टॉक्समध्ये २.२९% ची वाढ झाली व त्यांनी १,०२३.५० रुपयांवर व्यापार केला. एम्पॅग्लीफ्लोझिन व मेटफॉर्मिन हायड्रोक्लोराइड आआर टॅबलेटसाठी कंपनीला अमेरिकी एफडीएकडून तत्कापुरती मंजुरी मिळाली. या गोळ्या आहार व व्यायामासाठी पुरवणी म्हणून वापरल्या जातात.

गुजरात अंबुजा एक्सपोर्ट्स लि.: कंपनीचे स्टॉक्स १.३४ % नी वाढले व त्यांनी १४०.२० रुपयांवर व्यापार केला. कंपनीने डिसेंबरच्या तिमाहितील शेअरहोल्डिंग पॅटर्न जाहीर केला. त्यात डिसेंबरच्या तिमाहीत फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी कंपनीत आपला हिस्सा वाढवला.

पीएनसी इन्फ्राटेक लि.: अनेक फंड हाऊसनी पीएनसी इन्फ्राटेकचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले. त्यानंतर कंपनीच्या स्टॉक्समध्ये ४.१८% नी वाढ झाली व त्यांनी १८३.०० रुपयांवर व्यापार केला. अॅक्सिस एमएफने कंपनीचे २२ लाख इक्विटी शेअर्स १७५ रुपये प्रति शेअर नुसार अधिगृत केले. तर निप्पॉन इंडिया म्युच्युअल फंडने त्याच किंमतीत २५ लाख शेअर्स अधिगृहित केले.

जागतिक बाजारपेठ: विषाणूच्या नव्या स्ट्रेनच्या चिंतेने जागतिक बाजार निर्देशांक लाल रंगात स्थिरावला. एफटीएसई १०० चे शेअर्स ०.५८ % नी घसरले एफटीएसई एमआयबी चे शेअर्स ०.३७% नी घटले. तर हँगसेंगचे शेअर्सही ०.५२ % वर घसरले. याउलट, निक्केई २२५ चे शेअर्स १.६०% नी वाढले.


Back to top button
Don`t copy text!