सलग दुसऱ्या सत्रात भारतीय निर्देशांकांत घसरण

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २० जुलै २०२१ । मुंबई । जागतिक बाजारात कमकुवतेचे संकेत मिळाल्याने, भारतीय निर्देशांकांनीही आज सलग दुसऱ्या दिवशी गॅप-डाऊन ओपनिंग दर्शवली. एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार श्री अमर देव सिंह यांनी सांगितले की निफ्टी आणि सेन्सेक्सने कमी व्यापार केला, मात्र घसरणीवरून काहीशी सुधारणा घेतली. त्यामुळे एकूण विक्री काही प्रमाणात घटली. दरम्यान, घसरणीनंतर इंट्राडेमध्ये सुधारणा होऊनही निफ्टी १०० अंकांपेक्षा जास्त घसरला. तर निफ्टी बँक सलग ३ सत्रांनंतर घट दर्शवत ६५० अंकांच्या घसरणीवर स्थिरावली.

ब्रॉडर मार्केटची कामगिरी पाहता, बेंचमार्क निर्देशांकाच्या कामगिरीप्रमाणेच हेही निर्देशांक नकारात्मक स्थितीत राहिले. मिडकॅप निर्देशांक १ टक्क्यांपेक्षा जास्त कपातीवर स्थिरावले. तर स्मॉल कॅप निर्देशांकाने ७ दिवसांची विजयी घडामोड मोडीत काढत १.४१ टक्क्यांची घट अनुभवली. सेक्टर्सची कामगिरी पाहता, एफएमसीजी सेक्टर हा टॉप गेनर ठरला. तर उर्वरीत सर्व सेक्टर्सचे निर्देशांक नकारात्मक दिसले. निफ्टी मीडिया, रिअॅलिटी आणि मेटल निर्देशांक हे टॉप लूझर्स ठरले. त्यांनी प्रत्येकी २ टक्क्यांपेक्षा जास्त घट अनुभवली. तर स्टॉक्सच्या आघाडीवर हिंडाल्को, इंडसइंड बँक आणि टाटा स्टील हे टॉप लूझर्स ठरले. तसेच एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्तान युनिलिव्हर हे टॉप गेनर्स ठरले. त्यांनी १-५ टक्क्यांच्या रेंजमध्ये नफा कमावला.

एसीसी कंपनीने आर्थिक वर्ष २२ च्या पहिल्या तिमाहीत नफा आणि महसूलात दमदार वृद्धी नोंदवली. त्यानंतर कंपनीचे स्टॉक्स ७% नी वाढले. मागील तिमाहीच्या तुलनेत त्रैमासिक उत्पन्न जास्त दर्शवल्याने, एचसीएल टेक कंपनीच्या स्टॉक्सनी इंट्रा डेमध्ये २ टक्क्यांची घसरण अनुभवली. म्हणून एकूण स्टॉक्समध्येही प्रॉफिट बुकिंग दिसून आले.

एकूणच, गॅप डाऊन ओपनिंगनंतर निर्देशांकांनी अस्थिर सत्र अनुभवले. सलग तिसऱ्या दिवशी घसरण अनुभवताना सोमवारचे विक्री सत्र कायम दिसून आले. ३०-शेअर्सचे बीएसई सेन्सेक्सने, ३५४ अंक किंवा ०.६८ टक्क्यांची घसरण घेत ५२,१९८ अंकांवर विश्रांती घेतली. निफ्टी निर्देशांकांनी १२० अंक किंवा ०.७६ टक्क्यांची घट दर्शवत १५६३२ अंकांवर विश्रांती घेतली. येत्या काही दिवसांत, १५८५०-१५९०० या अपसाइड लेव्हल्सवर लक्ष ठेवता येईल तर डाऊनसाईडमध्ये १५५००-१५४५० या लेव्हल्सवर लक्ष ठेवावे लागेल.


Back to top button
Don`t copy text!