
स्थैर्य, अहमदाबाद, दि २४: यजमान टीम इंडिया व इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या कसोटीला उद्या बुधवारपासून सुरुवात हाेणार अाहे. या कसोटीचे आशियातील माेठ्या माेटेरा स्टेडियमवर अायाेजन करण्यात अाले. एलइडीच्या प्रकाशझाेतात हे सामने हाेतील. पावसानंतर अवघ्या ३० मिनिटांत खेळाला सुरुवात हाेईल. पिंक बाॅलवरची ही कसाेटी डे-नाइट अाहे. भारताने अातापर्यंत दाेन वेळा डे-नाइट कसाेटी खेळली अाहे. घरच्या मैदानावरील डे-नाइट कसोटीत भारताने विजय मिळवला. मात्र, अाॅस्ट्रेलिया दाैऱ्यात अॅडिलेड डे-नाइट कसोटीत टीम इंडियाचा पराभव झाला हाेता. इंग्लंडने अातापर्यंत तीन डे-नाइट कसाेटी खेळल्या अाहेत. यातील पहिल्या कसोटीत इंग्लंडने २०१७ मध्ये विंंडीजवर मात केली. मात्र, इंग्लंडला त्यानंतरच्या दोन्ही कसोटीत अाॅस्ट्रेलिया अाणि न्यूझीलंडने पराभूत केले हाेते. इतिहासात १५ डे-नाइट कसाेटी झाल्या. या सर्वच कसाेटी सामन्यांचे निकाल लागले. सहा कसोटीत संघांनी डावाने विजयाची नाेंद केली. इंग्लंडने विंडीजला अाणि भारताने बांंगलादेशवर डावाने मात केली हाेती.
उर्वरित दाेन कसाेटी : भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित, मयंक, शुभमान गिल, पुजारा, रहाणे , लोकेश राहुल, हार्दिक, ऋषभ पंत, साहा,अार. अश्विन, कुलदीप यादव,अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, माे. सिराज, उमेश यादव.
एकूण ११ खेळपट्ट्यांचे मैदान
मोटेरावर एकूण ११ खेळपट्ट्या तयार करण्यात अाली. मात्र, यातील फक्त पाच खेळपट्टीचा वापर केला जाईल. यातील तीन पीच लाल अाणि दाेन पीच काळ्या मातीचा वापर करून तयार करण्यात अालेला अाहेेत.
इंग्लंडच्या सहा खेळाडूंना अनुभव
इंग्लंड संघाने २०१८ मध्ये पिंक बाॅल कसोटी खेळली. यातील सहा खेळाडू हे अाताच्या संघात अाहेत. ऋषभ पंत व शुभमानवगळता भारतीय संघातील सर्वच खेळाडूंना या कसाेटीचा माेठा अनुभव अाहे.
भारताचा अॅडिलेडवर ३६ धावांत खुर्दा
डे-नाइट कसोटीत नीचांकी धावसंख्येची नाेंद भारत व इंग्लंडच्या नावे नाेंद अाहे. भारताचा अाॅस्ट्रेलियाविरुद्ध ३६ धावांत खुर्दा उडाला होता. २०१८ मध्ये इंग्लंडचा न्यूझीलंडविरुद्ध कसाेटीत ५८ धावांत धुव्वा उडाला. इंग्लंडने २७ धावांसाठी ९ विकेट गमावल्या हाेत्या.