स्थैर्य, औंध, दि. ०५ : औंध येथील केदारचौक परिसरातील नागरिकांच्या आरोग्यास धोकादायक बनलेला बंधारा काढून टाकण्यात यावा यासाठी सुरू केलेल बेमुदत उपोषण ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांनी पाचव्या दिवशी ही सुरू ठेवले होते दरम्यान गुरूवारी सायंकाळी तालुका कूषी अधिकारी राहुल जितकर यांनी जगदाळे यांच्याशी चर्चा केली व उपोषण मागे घेण्याची विनंती केली मात्र बंधारा हटविल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची माहिती जगदाळे यांनी दिली.
यावेळी उपसरपंच दिपक नलवडे, ग्रामपंचायत सदस्य तानाजी इंगळे, वसंत पवार, दत्तात्रय जगदाळे, संदिप इंगळे, ग्रामसेवक चाँदशा काझी, कूषी सहाय्यक यु.एम.तिकोटे, मोहन मदने,शैलेश मिठारी,हणमंत जायकर आदी प्रमुख मान्यवर ग्रामस्थ ,महिला उपस्थित होत्या.
केदार चौक परिसरातील उपस्थित महिला ही यावेळी प्रचंड आक्रमक झाल्या होत्या. हा बंधारा त्वरित हटवावा ,आमच्या आरोग्याचा ,पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा अशी आग्रही मागणी यावेळी महिलांनी लावून धरली. त्याचबरोबर उपस्थित ग्रामस्थांनी जिल्हा कूषी अधिकारी,कूषी आयुक्तांनी हा प्रश्न तातडीने निकाली काढावा अशी मागणी केली.