अविश्वसनीय ! पालकची भाजी पाठवू शकणार आता ई मेल! शास्त्रज्ञांना मोठं यश

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य,वॉशिंग्टन,दि.२: ‘अविश्वसनिय ! पालकची भाजी पाठवू शकणार आता ई मेल! शास्त्रज्ञांना मोठं यश’ हे वाचून तुम्हाला एखादी भविष्य काळातील वैज्ञानिक कादंबरी किंवा कथा वाचत असल्यासारखं वाटेल पण तसं नाहीये. हे खरं आहे, पालकची भाजी ईमेल पाठवू शकते. अमेरिकेतील एका संस्थेनं केलेल्या संशोधनामध्ये पालकची भाजी ईमेल पाठूव शकते हे समोर आले आहे. तर, पालकची भाजी वातावरण बदलाबाबतही आपल्याला इशारा देऊ शकते. हे संशोधन अमेरिकेतील Massachusetts Institute of Technology या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी केले आहे. (Palak Spinach to send emails and warns about climate change research by American scientists)

इन्फ्रारेड कॅमेऱ्याद्वारे ईमेल पाठवला जाणार

Massachusetts Institute of Technology या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी नॅनोटेक्नोलॉजी तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं पालक भाजीच्या रोपांना सेंसरमध्ये परावर्तित केले. त्यानंतर पालकची रोपं शास्त्रज्ञांकडे वायरलेसद्वारे माहिती पोहोचवली जाऊ शकते. पालकची मुळं जमिनीमधील पाण्यातील निट्रोअरोमॅटिक्स शोधून घेतात. निट्रोअरोमॅटिक्स भुसरुंगात आढळते. पालकमध्ये असणारे कार्बन नॅनोट्युब्स सिग्नल सोडतात. ते सिग्लन इन्फ्रारेड कॅमेऱ्याद्वारे वाचला जाऊ शकतो. त्यानंतर पुढे ईमेल अ‌ॅलर्ट शास्त्रज्ञांपर्यंत पोहोचवला जाऊ शकतो. वनस्पतींमधील इलेक्ट्रॉनिक कण आणि यंत्रणांचा शोध घेण्याच्या मोठ्या संशोधन प्रकल्पातील संशोधनात हे समोर आले आहे. या तंत्रज्ञांनाला प्लांट नॅनोबायोनिक्स म्हटलं जाते.

 

वनस्पती मानव संप्रेषणातील ( Communication) अडथळा दूर

या संशोधनाचं नेतृत्व करणारे मायकल स्ट्रॅनो सांगतात की पालक भाजीसंदर्भात झालेल्या संशोधनामुळं भविष्यातील मानव आणि वनसप्ती यांच्यातील संप्रषेणातील(Communication) अडथळे दूर होतील.

पर्यावरणीय फायदे

मायकल स्ट्रॅनो सांगतात, पालक भाजी संदर्भात झालेल्या संशोधनाचा फायद आगामी काळात प्रदूषण आणि पर्यावरणीय समस्यांचा अभ्यास करण्यासाठी होणार आहे. परिसंस्थेत होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी याचा फायदा होणार आहे. मायकल स्ट्रॅनो सांगतात, वनस्पती पर्यावरणात होणाऱ्या बदलांबद्दल संवेदनशील असतात. त्यांना येणाऱ्या काळात दुष्काळ पडणार आहे, याचं संकेत मानवाच्या अगोदर समजतात. माती आणि पाण्यामध्ये थोडासा जरी बदल झाला तरी वनस्पतींना समजतं. आपल्याला त्यासाठी केमिकल सिग्नलिंग पद्धतीचा वापर करावा, असं स्ट्रॅनो म्हणतात.

संशोधनासाठी पालकची निवड का?

पालक भाजीमध्ये मोठ्या प्रमाणावर लोह आणि नायट्रोजन मोठ्या प्रमाणावर असते. लोह आणि नायट्रोजन उत्प्रेरक म्हणून काम करतात. Massachusetts Institute of Technology या संस्थेची स्थापना 1861 मध्ये झाली होती. ही संस्था सुरु झाली तेव्हा बोस्टनमध्ये कार्यरत होती. 1916 मध्ये ती केंब्रिज विद्यापीठामध्ये स्थलांतरित झाली. विज्ञान, तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रातील विद्यार्थ्यांना संशोधनास मदत करते. मूलभूत संशोधनाच्या क्षेत्रात ही कार्यरत आहे.


Back to top button
Don`t copy text!