
स्थैर्य, वावरहिरे, दि.१६: माण तालुक्यातील उत्तर भागातील वावरहिरे, राणंद,शिंगणापुर,मोही मार्डी,दानवलेवाडी,सोकासन, थादाळे परिसरात परतीच्या पावसाने जोर धरल्याने खरिप हंगामातील बाजरी,कांदा,घेवडा,भुईमुग,ऊस आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. माण तालुका हा अवर्षण ग्रस्त भागात मोडत असल्याने दरवर्षी पावसाचे प्रमाण अत्यंल्प असते त्यामुळे येथील जनता नेहमीच पाणी टंचाईला तोंड देत असते.परंतु या दोन वर्षात या भागावर वरुणराजाची मोठी कृपादृष्टी लाभली. तालुक्यातील सर्व पाझरतलावे ओव्हरप्लो झाले.छोटे मोठे बंधारे,ओढे,नाले कधी नव्हे खळखळुन वाहु लागले. कायम कोरडी ठणठणीत असणारी माणनदी यावर्षीही पुन्हा दुथडी भरुन वाहु लागली.यावर्षी सर्वञ चांगला पाऊस झाल्याने शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण होते.यंदा शेतीतुन चांगले उत्पन्न मिळेल हि अपेक्षा बाळगुन या वाढत्या माहागाईच्या काळात संसाराचा गाढा चालवण्यासाठी चार पैसे मिळावेत,डोक्यावरील कर्जाचा बोजा कमी व्हावा,सावकाराचे कर्ज फिटावे,मुलाबाळांना चांगले शिक्षण मिळावे म्हणुन येथील शेतकरी मोठ्या कष्टाने नकदी पिके घेवु लागला. शेतीतील पिकेही सोन्यासारखी जोमदार उभी राहिली. आता पिके काढणीला आली परंतु सततच्या पावसाने हि पिके काढण्यास शेतकर्याला पुरेसा वेळ मिळत नव्हता.पंधरा दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने उघडीप दिल्याने खरिप पिके काढणी व मळणी करण्यात शेतकरी व्यस्त होतो. परंतु अचानक आलेला परतीच्या पाऊसाने सर्वञ हाहाकारा माजवला. दुष्काळी माणच्या उत्तर भागातील वावरहिरे,राणंद,मोही मार्डी,सोकासन,दानवलेवाडी, थादाळे,शिंगणापुर परिसरात जोराच्या वार्यासह ढगफुटी सारख्खा पडणार्या या परतीच्या पावसाने सतत जोर धरल्याने ओढे, नाले,बंधारे,छोटेमोठे पाझर तलाव ओसांडुन वाहु लागले. या पावसाने खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली.शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने बाजरीची कणसे शेतातच पडुन आहेत,कांदा पुर्णता पाण्यात गेल्याने कुजण्याच्या मार्गावर आहे.हातातोडाशी आलेला घास परतीच्या पावसाने हिरावल्याने या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने मुलांचे शिक्षण,बॅकांचे कर्ज,संसाराचा गाढा ओडायचा कसा या विवंचनेत काटेरी दुष्टचक्रात शेतकरी अडकल्याने मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.शासनाने नुकसान झालेल्या सर्व पिकांचा सर्व्हे करुन त्वरित नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.