स्थैर्य, फलटण : कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या आवारातील आजच्या साप्ताहिक भुसार बाजारात गहु व मक्याच्या आवकेत वाढ झाली असून दर समाधानकारक निघाल्याचे बाजार समिती चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सांगितले. रविवारच्या साप्ताहिक भुसार बाजारात ज्वारी ११० क्विंटल आवक होती, दर प्रति क्विंटल १८०० ते ३४०० रुपये, बाजरी आवक १३९ क्विंटल दर प्रतिक्विंटल १४०० ते १९०० रुपये, गहु आवक २७८ क्विंटल, दर प्रति क्विंटल १७०० ते २५०० रुपये, हरभरा आवक १२४ क्विंटल दर प्रति क्विंटल ३५०० ते ५५०० रुपये, मका आवक ३५५ क्विंटल दर प्रति क्विंटल १२७५ ते १५०० रुपये, मूग आवक ३ क्विंटल दर प्रति क्विंटल ३८५० ते ५८५८ रुपये, घेवडा आवक २ क्विंटल दर प्रति क्विंटल १८०० ते २००० रुपये, तांदूळ आवक २७ क्विंटल दर प्रति क्विंटल १५०० ते १६०० रुपये, भुईमूग शेंग आवक ८ क्विंटल दर प्रति क्विंटल ४००० ते ५००० रुपयांपर्यंत निघाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली आहे.