कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाही एसटी महामंडळाच्या उत्पन्नात वाढ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१४ फेब्रुवारी २०२१ । मुंबई । एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप कायम आहे तर दुसरीकडे महामंडळकडून खासगी चालकांच्या हाती ‘लाल परी’चे स्टिअरिंग देत एसटी महामंडळाने ‘टॉप गीअर टाकला आहे. औरंगाबाद विभागात एजन्सीमार्फत ५० चालकांची भरती करण्यात आली असून ते विविध मार्गावर प्रवासी वाहतूक करीत आहेत. त्यामुळे एसटी उत्पन्नातही वाढ होताना पाहायला मिळत आहे.

तीन महिने उलटूनही एसटीच्या संपावर तोडगा निघू शकला नाही. प्रकरण कोर्टात असून, सरकार आणि संपकरी यांच्यात होणारी चर्चाही बंद झाली आहे. त्यामुळे संप अजून किती दिवस चालू राहील याबाबत अंदाज लावता येत नाही. पण एसटी महामंडळाकडून अशा काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नयेत म्हणून, खासगी चालकांची भरती सुरू केली आहे. एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद विभागात ५० खासगी चालक घेण्यात आलेले आहे. गेल्या काही दिवसांत औरंगाबाद विभागाच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. रोजचे उत्पन्न सध्या २६ लाख रुपयांपर्यंत पोहोचले असल्याचं अधिकारी म्हणाले.

औरंगाबाद विभागात एकूण २ हजार ६८४ कर्मचारी असून त्यापैकी १ हजार ६३४ कर्मचारी अजूनही संपात सहभागी आहेत. अशातच महामंडळाने आता यांत्रिकी कर्मचारी आणि सहायक वाहतूक निरीक्षकांना एसटी चालक म्हणून वापरण्याचा निर्णय घेतला आहे. सोबतच वाहतूक नियंत्रकांकडे वाहकाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


Back to top button
Don`t copy text!