वेळे येथे जिल्हयातील पहिल्या गोबरधन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांच्याहस्ते उद्घाटन

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑगस्ट २०२३ । सातारा । कोणाताही सार्वजनिक प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी नागरिकांमधील एकी महत्वपुर्ण घटक आहे. त्यामुळे गोबरधन प्रकल्पाबरोबरच जलजीवन मिशन अंतर्गत कामे, सांडपाणी व्यवस्थापन हि कामे पूर्ण करुन पर्यावरणपूरक गाव करण्याचा महत्वपूर्ण टप्पा गावक-यांनी पुर्ण करावा,असे आवाहन करुन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी यांनी गोबरधन प्रकल्पामुळे ग्रामपंचायतीच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. येणा-या काळात असे अनेक प्रकल्प जिल्हयात राबविले जाणार आहेत असे सांगितले. यावेळी त्यांनी हा प्रकल्प वेळेत पुर्ण केल्याबद्दल वेळे ग्रामस्थांचे कौतुक केले.

वाई तालुक्यातील वेळे येथील जिल्हयातील पहिल्या गोबरधन प्रकल्पाचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री ज्ञानेश्वर खिलारी यांचे हस्ते करण्यात आले.

प्लॉनेट ईनव्हारमेंट सर्विसेस प्रा. लि. कोल्हापुर यांनी प्रकल्पाचे बांधकाम केले आहे. सदर प्रकल्पाची किंमत 26 लाख रुपये आहे. सदर प्रकल्प हा 50 घन मिटर क्षमतेचा असुन सदर प्रकल्पातून शेण व ओल्या कच-यापासून खत निर्मिती केली जाणार आहे.

यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी क्रांती बोराटे, कार्यकारी अभियंता गौरव चक्के, गटविकास अधिकारी श्री. घोलप, सहायक गटविकास अधिकारी श्री कुचेकर, उप अभियंता सुनिल मेटकरी,  महादेव मस्कर, अनिल जगताप, रविंद्र जाधव,रविंद्र बोडके,शशिकांत पवार, अकुंश कांगडे व जिल्हा तज्ञ धनाजी पाटील, अजय राऊत, सरपंच रफिक इनामदार व बि.आर.सी रोहित जाधव, मनोज खेडकर, ग्रा.प.सदस्य व ग्रामसेवक श्री डेरे, ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!