पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ


दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सह्याद्री सहकारी साखर कारखाना लि. यशवंतनगर या साखर कारखान्याचा सन 2021 -22 च्या 48 व्या गळीत हंगामाचा शुभारंभ सहकार व पणन तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या शुभारंभाप्रसंगी कारखान्याचे संचालक सुरेश माने, जि. प. चे अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांच्यासह विद्यमान संचालक व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

या वर्षी सह्याद्री साखर कारखान्यामार्फत जास्तीत जास्त गाळप होण्यासाठी प्रयत्न केला जाईल. यासाठी ऊसतोड मजूरांसह कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज असल्याचे श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!