
दैनिक स्थैर्य । दि. १९ नोव्हेंबर २०२२ । सातारा । नियोजन विभाग, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, सातारा यांच्यावतीने “पुणे विभागीय क्रीडा स्पर्धा, २०२२” चे शनिवार दि. १९ नोव्हेंबर, २०२२ रोजी श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते झाले.
यावेळी राजेश तितर, विशेष कार्य अधिकारी (तीर्थक्षेत्र विकास शाखा), विभागीय कार्यालय, पुणे, हणमंत माळी, सहसंचालक, अर्थ व सांख्यिकी संचालनालय, प्रादेशिक कार्यालय, पुणे, संजय कोलगणे, उपायुक्त (नियोजन), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे, शशिकांत माळी, जिल्हा नियोजन अधिकारी, सातारा, श्रीमती तृप्ती निंबाळकर, प्र.उपसंचालक, जिल्हा सांख्यिकी कार्यालय,सातारा, युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी तसेच पुणे विभागातील सर्व जिल्हा नियोजन अधिकारी, सर्व उपसंचालक, जिल्हा सांख्यिंकी कार्यालय आणि अर्थ व सांख्यिकी संचालनालया अंतर्गत इतर विविध विभागातील मान्यवर व खेळाडू, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यावेळी विजेत्या खेळाडूंना चषक व पदक देऊन गौरविण्यात आले.