
दैनिक स्थैर्य | दि. ३० डिसेंबर २०२३ | फलटण |
मराठा क्रांती मोर्चा, फलटण मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन रविवार, दि. ७ जानेवारी २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता संपन्न होणार आहे. या सोहळ्याची सुरूवात सायंकाळी ४ वाजता शोभायात्रेने होणार असून उद्घाटनानंतर ५.३० वाजता शिवशाहीर श्री. संतोष साळुंखे (लातूर) यांचा शाहिरी पोवाडा होणार आहे.
हे मध्यवर्ती कार्यालय स्वरा हाईटस्, गाळा नं. २, बेसमेंट, डी.एड् चौक, रिंग रोड, फलटण येथे होणार असून कार्यक्रम स्थळ हेच असणार आहे.
या उद्घाटन सोहळ्यास सर्व मराठा बंधू-भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सकल मराठा समाज, मराठा क्रांती मोर्चा फलटण तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.
मराठा समाजातील ज्या लोकांच्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवून देणेसाठी मदत करणे, मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शासकीय, सामाजिक, प्रशासकीय, शैक्षणिक क्षेत्रात येणार्या अडचणी सोडविण्यासाठी मदत करणे, मराठा समाजातील सुशिक्षित व बेरोजगार मुलांना उद्योगााठी आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ व सारथी योजनेंतर्गत कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणे इ. प्रमुख कामे या मध्यवर्ती कार्यालयामार्फत करण्यात येणार आहेत.