मुद्रा महिला बचत गटाच्या घरगुती जेवण व अल्पोहार केंद्राचे उद्घाटन करताना सहकार क्षेत्रातील समाजसेवक अनिल मोरे. सोबत मुंबई काँग्रेस सचिव महेंद्र मुंगणेकर, रोजगार स्व.रो.चे मुंबई काँग्रेस सचिव प्रसन्न नांगावकर, मुद्रा महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा सौ.ज्योती मनोज माने, खजिनदार सौ.शोभा कांबळे, सदस्या सुजाता धनावडे.
स्थैर्य, फलटण : नांयगाव विभागातील पोलिस मुख्यालयाजवळ जवळ नांयगाव मधील सर्वसामान्य नागरिकांना व पोलिस बांधवाना परवडेल अशा वाजवी दरात अनघा पोळी भाजी केंद्र व मुद्रा महिला बचत गट संचलित घरगुती जेवण व अल्पोहार केंद्राचे उद्घाटन मुंबई काँग्रेसचे सचिव महेंद्र मुंगणेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. स्टाँलची फित कापून सहकार क्षेत्रातील समाजसेवक अनिल मोरे यांनी बचत गटाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी प्रमुख पाहूणे रोजगार स्वयंमरोजगार मुंबई काँग्रेसचे सचिव प्रसन्न नांगावकर उपस्थित होते. तसेच मुद्रा महिला बचत गटाच्या संस्थापक अध्यक्षा सौ.ज्योती मनोज माने, खजिनदार सौ.शोभा कांबळे, सदस्या सौ.सुजाता धनावडे तसेच अनघा संस्थेचे संचालक दिलीप परुळेकर, संचालक प्रशांत माने तसेच सातारा जिल्हा विकास समिती ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष मनोज माने उपस्थित होते. विभागातील नागरिकांनकडून पहिल्याच दिवशी चांगला प्रतिसाद मिळाला.