भाडळीत खासदार रणजितसिंह यांच्या निधीतून हायमास्ट लाईट पोलचे उद्घाटन 


स्थैर्य, कोळकी, दि. १२ : माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या स्थानिक विकास निधी मधून फलटण तालुक्यातील भाडळी बुद्रुक या गावामध्ये हायमास्ट लाईट पोलचे उद्घाटन नुकतेच संपन्न झाले. गावामध्ये हायमास्ट लाईट पोल दिल्याबद्दल भाडळी ग्रामस्थांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विशेष आभार मानले.

प्रसिद्ध बागायतदार तुकाराम यशवंत डांगे यांच्या हस्ते हायमास्ट लाईट पोलचे अनावरण झाले. यावेळी रघुनाथ डांगे, दत्तात्रेय डांगे, वसंत डांगे, मोहन सावंत, विजय डांगे, गोपीनाथ डांगे, विजय घाटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

भाडळी बुद्रुक गावचा विकास करण्यासाठी आगामी काळामध्ये जो काही निधी लागेल तो भरघोस निधी भाडळी बुद्रुक गावाला दिला जाईल, असे आश्वासन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी ग्रामस्थांना भेटीदरम्यान दिलेले आहे.

भाडळी बुद्रुक गावामध्ये हायमास्ट लाईट बसवण्यासाठी फलटण नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर व भारतीय जनता पार्टीचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभल्याबद्दल भाडळी ग्रामस्थांच्यावतीने गोपीनाथ डांगे यांनी आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!