दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । फलटण । महात्मा गांधीजींनी शांतता व अहिंसेच्या मार्गाने देशाला ब्रिटिश सत्तेपासून मुक्त करत जगाला अहिंसात्मक क्रांतीचा नवा मार्ग दाखवला. खेड्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी ग्रामस्वराज्य संकल्पना मांडली. गांधीजींचे विचार व मूल्ये आजच्या काळात तेवढीच समर्पक आहेत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना व राष्ट्रभक्त माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री जयंती दिनी विनम्र अभिवादन निरगुडी ग्रामपंचायत सरपंच सौ.कोमल सचिन सस्ते व उपसरपंच सौ. सारिका महावीर बनसोडे व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक व निरगुडी ग्रामस्थ यांच्यावतीने करण्यात आले.
महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून निरगुडी गावांमध्ये घंटागाडी चालू करण्यात आली. घंटागाडीची पूजन निरगुडी गावचे प्रतिष्ठित नागरिक फॉरेस्ट खात्याचे अधिकारी विलास रघुनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले व निरगुडी ग्रामस्थांच्या वतीने पूजन करण्यात आले.