जागल्यांचा लोकजागर अखंड राहावा ! पत्रलेखन चळवळीच्या अमृत महोत्सवाचा शुभारंभ

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १९ ऑगस्ट २०२२ । मुंबई । वृत्तपत्र लेखक हा वृत्तपत्राचा आत्मा असतो. एक कोपरा हा खास वाचकांच्या पत्रांसाठी राखीव असतो. त्यामध्ये अनेक वाचक अल्प शब्दांमध्ये आपापली मते, विचार, तक्रारी वा सूचना मांडत असतात. अशा सदरातून सातत्याने पत्रलेखन करणे हे एक जागरूक नागरिक असल्याचे लक्षण असते. एक प्रकारे ते समाजातील ‘जागल्या’ची भूमिका करतात ! लोकशाही व्यवस्था जिवंत राहण्यासाठी आणि समाजमनातील आंदोलने  टिपण्यासाठी हे सदर फार महत्त्वाचे असते. २२ ऑगस्ट १९४९ रोजी फोर्टच्या तांबे उपाहारगृहात त्यावेळी संपादकीय पानावावर पत्रलेखन करणाऱ्यांचे संमेलन मोठ्या उत्साहाने पार पडले होते. या घटनेचा अमृत महोत्सव यंदा सुरु होत आहे. याविषयी पत्रलेखन चळवळीचा आढावा घेणारा हा लेख …..

समाजातील विविध घटनादररोज घडणाऱ्या घडामोडी छापील स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचव्यात,  या उद्देशाने वृत्तपत्रे सुरु झाली. पुढे विविध भाषेतून प्रकाशित झालेली वृत्तपत्रे वाचक वाचू लागलेपण त्या वाचकांमधून काही जागृत वाचक वृत्तपत्रे बारकाईने वाचू लागलेत्या वर्तमानपत्रामधील बातम्या,संपादकांचे मनोगत अशा वेगवेगळ्या विषयांबद्दल आपले स्वतःचे मत तो जागृत वाचक पत्ररूपाने वृत्तपत्रांच्या संपादकांस कळवू लागले. यातूनच संपादक व जागृत वाचक यांच्या विचारांची सांगड एकत्र येऊन वृत्तपत्र लेखक (म्हणजे समाजातला जागल्या) निर्माण झाला.

वाचकांच्या पत्रांना मराठी वृत्तपत्रात सतत महत्वाचे स्थान मिळत आले आहे. दर्पण या पहिल्या वृत्तपत्रातही वाचकांची पत्रे  प्रथमपासून आढळतात. क्वचित संपादकीय उत्तरासह पत्रे  प्रसिद्ध होत असत. वाचकाला मनमोकळेपणाने बोलता करणारे वाचकांची पत्रे सदर आहे. दर्पण मध्येही अतिशय स्पष्टपणे वाचकांनी लिहिलेली पत्रे आढळतात. मराठी निबंधांचे मूळही  अशा पत्रातून सापडत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. ज्ञान प्रबोधनासाठी अस्तित्वात  आलेल्या दर्पण पत्रात वाचकांना  सामान्यतः  मोकळेपणाने आपले मनोगत व्यक्त करण्याची  संधी  देण्यात  येत असली, तरी संपादक बाळशास्त्री  त्यांचा संयम सुटू न देण्याची दक्षता घेत असत.   

प्रसारमाध्यमांची वाटचाल छापील वृत्तपत्रकांडून इलेक्ट्रॉनिक व्हाया ऑनलाइनकडे झाली असली तरी या सर्वांचा कान असलेल्या वाचकांचा विसर मात्र कोणत्याही माध्यमांना झालेला नाही. ‘वाचकांचा पत्रव्यवहार‘ हे सदर आजही दैनिक,नियतकालिकामंध्ये आपले अस्तित्व टिकवून आहे. वृत्तपत्रसृष्टीच्या प्रारंभापासूनच वाचक पत्रव्यवहाराचे सामाजिक महत्व ओळखून या पत्रव्यवहारास संपादकीय पानावर खास जागा दिली आहे. वाचकांना आपली मतेविचारतक्रारीअपेक्षावादविवादावरील प्रतिक्रिया व्यक्त करण्याची जणू हक्काची जागाच एका व्यासपीठाप्रमाणे पत्रव्यवहाराच्या सदरात उपलब्ध होते. वाचकांच्या पात्रातून समाजमनाची स्पंदनेसमाजाच्या जाणीवा व्यक्त होतात.

वृत्तपत्रात प्रसिद्ध होणारी बहुंतांशी पत्रे स्थापित सत्तेच्या विविध खात्यांचा हलगर्जीपणाबेपर्वाईउद्दामपणाभ्रष्टचारदिरंगाईजातीयवादप्रांतीयवादभाषावाद आणि दुर्गुणांविरुद्ध  हाकाटीच्या स्वरूपाची असतात. हा उसळणारा उद्रेक ब्रिटिश काळापासून स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षातही सुरु आहे. आणि अलीकडे तर तो सर्वच क्षेत्रातून उमटत आहेपरंतु ही हाकाटीची वाचा ऐकण्यासाठी झापडबंद कान अधिक संख्येने सरकार आणि विविध खात्यात निर्माण झाले आहेत. ८ ऑगस्ट १९६४ च्या पत्रात विश्वनाथ नेसरीकर यांनी ‘न ऐकणाऱ्यांना जलफळाटाचे उद्रेक कशासाठी ऐकवता ? ‘ असा सवाल केला होता तो अजूनही निरंतर सुरूच आहे.

समाजमनाच्या जिवंतपणाचा प्रत्यय देणाऱ्या या पत्रव्यवहाराला आणि ते सातत्याने लिहिणाऱ्या पत्रलेखकांना समाजमान्यता देण्याचा पहिला प्रयत्न ‘जनसामान्यांची महाशक्ती‘ हे बिरुदावली मानाने मिरवणाऱ्या दैनिक नवशक्तीने पुढाकार घेऊन केला. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देश घडवण्याचा प्रयत्न सर्वच आघाडीवर सुरु होता. वृत्तपत्रांनीसुद्धा या सोनेरी पहाटेचे स्वागत करून देश एकसंध करण्याचा आणि एकजुटीने पुढे जाताना विकासाचा दृष्टीकोन काय असायला हवा याची मांडणी करण्याचा प्रयत्न सुरु केला होता. मात्र समाजमन घडवण्यासाठी ‘सामान्य वाचक‘ हा सुद्धा व्यक्त होऊन वाचकांच्या पत्रातून अनेक चांगल्या उपयुक्त सूचना करू शकतो व काही चुकीचे घडत असेल तर तो त्यावर निस्वार्थी आणि परखडपणे प्रहार सुद्धा करू शकतो याचे महत्व विचारवंत असलेल्या प्रभाकर पाध्ये यांनी १९४९ पूर्वीच ओळखले होते. त्यांनी नवशक्तीमध्ये ‘जनमनाचा कानोसा‘ हा वाचकांच्या पत्रव्यवहासाठी वेगळा स्तंभ सुरु केला. त्याला वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.संपादक प्रभाकर पाध्ये आणि सहसंपादक श्रीकांत पालेकर यांनी नवशक्तीचे संचालक श्री सदानंद व श्री डी.एन. नाडकर्णी यांच्या सहकार्याने पत्रलेखनाचे संमेलन भरवण्याचा प्रयत्न केला.२२ ऑगस्ट १९४९ रोजी त्यावेळच्या फोर्टच्या सुप्रसिद्ध तांबे उपाहारगृहात त्यावेळी नवशक्तीच्या जनमनाचा कानोसा या सदरातून पत्रलेखन करणाऱ्यांचे पहिले संमेलन नवशक्तीने आयोजित केले होते. जवळजवळ २०० पत्रलेखक हजर होते. मोठ्या उत्साहाने पार पडलेल्या या पहिल्या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा अनंत काणेकर हे होते. तर सन्माननीय पाहुण्यांमध्ये मुंबई सरकारचे प्रसिद्धी प्रमुख श्री अय्यरप्रा. वा. ल. कुलकर्णीअप्पा पेंडसेर.गो.सरदेसाईवा.रा.ढवळेनि.श.नवरेवि ह कुलकर्णी, व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे,  रा भी जोशीसुधा जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.केसरीचे संपादक दि वि गोखलेइतिहास संशोधक न.र.फाटक यांनी शुभेच्छा पत्रे पाठवली होती. सदर संमेलन कमालीचे यशस्वी झाल्यानंतर संपादक श्रीकांत पालेकर यांनी ही परंपरा केवळ पुढे चालविली नाही तर त्यात आपल्या परीने भर घातली. जनमनाचा कानोसा या सदरातील पत्रलेखकाला बोलका करूनच ते थांबले नाहीत तर विविध विषयांवरील पत्रे या सदरात प्रसिद्ध करून त्यांनी लोकशिक्षणाचेही कार्य साधले आणि त्यातूनच मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली. या घटनेचा अमृत महोत्सव सुरु होत आहे.  हा दिवस संघाच्या वतीने दरवर्षी ‘वृत्तपत्रलेखक दिन‘ म्हणून साजरा केला जातो. डॉ ज द सिधये हे सुरुवातीपासून या वृत्तपत्र लेखक चळवळीचे प्रमुख आधारस्तंभ होते. त्यांनंतर झालेल्या संमेलनांना आचार्य अत्रेप्रबोधनकार ठाकरे,प्रा वि ह कुलकर्णीकॅप्टन मा.कृ.शिंदेपा.वा.गाडगीळ,धनंजय किरबाळासाहेब देसाई यांनी अध्यक्ष म्हणून हजेरी लावली.या संमेलनाच्या निमित्ताने समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर व्यासपीठावर आले आणि वृत्तपत्रलेखकांचे प्रबोधन करून गेले आहेत.

वृत्तपत्र लेखक संघाला नेहमीच सृजनशील कार्यकर्ते लाभत गेले आहेत. ग शं सामंतमधू शिरोडकरगणेश केळकरमधुसूदन आचरेकरदत्ता टिपणीसभाई तांबेइस्माईल रखांगीवि. अ. सावंतविश्वनाथ पंडितसीताराम राणेरणजित केळस्कररामचंद्र पुजारेशांता भंडारेसुनील शिंदेनितीन चव्हाणमनोहर साळवीप्रकाश नागणेविजय कदममनोहर मांदाडकरनंदकुमार रोपळेकरमधुकर कुबलशरद वर्तकमिलिंद तांबे,दत्ताराम घुगेदिलीप ल सावंतअनंत आंगचेकररमेश सांगळेदिगंबर चव्हाणदत्ताराम गवससुनील कुवरे,अरुण खटावकर,प्रशांत भाटकर, नितीन कदमप्रशांत घाडीगावकर,आत्माराम गायकवाड अशी अनेकांची मांदियाळी लाभल्यामुळे गेल्या ७४ वर्षात नव्या कल्पना नवे उपक्रम नवे कार्यक्रम राबविता आले.

मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या १९७८ च्या संमेलनाला नवशक्तीचे संपादक पु रा बेहेरे उपस्थित होते. त्यांनी तत्कालीन मनपा आयुक्त भालचंद्र देशमुख याना संघाच्या कार्यालयासाठी जागा देण्याची सूचना केली. या सूचनेचा स्वीकार करीत देशमुख यांनी संघाला दादर-पूर्वेकडील शिंदेवाडी महापालिका शाळेत एक वर्गखोली उपलब्ध करून दिली. त्यामुळे त्यानंतरच्या काळात झपाट्याने संस्थेची वाढ झाली. राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धासर्वोत्कृष्ट पत्र स्पर्धासामान्य जनतेच्या प्रश्नावर वार्तालापवृत्तपत्र लेखक कार्यशाळा इत्यादी अनेक चांगले उपक्रम सुरु झाले आणि महाराष्ट्रभर संस्थेचे कार्य पोहोचविते ठरले.

मराठी अस्मिता‘ हे एकमेव ध्येय घेऊन कोणत्याही राजकीय प्रणालीची बांधिलकी न स्वीकारता केवळ समाज प्रबोधनाचे लक्ष डोळ्यासमोर ठेऊन कोणतेही आर्थिक पाठबळ नसताना आपल्या निस्पृह कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमावरच मराठी वृत्तपत्र लेखक संघाची वाटचाल जोमाने सुरु आहे.

नवशक्तीने ‘जनमनाचा कानोसा‘ या सदराला एकूणच दिशाजी प्रेरणा दिली त्यातून वृत्तपत्र लेखक चळवळीला चैतन्य मिळाले आहेत्यातून निर्माण झालेली उत्साहाची लाट कायम टिकली आहे. दररोज वृत्तपत्रलेखक आपले नवीन रूप धारण करून वाचकामध्ये लोकशिक्षणाचीप्रबोधनाचीदेशप्रेमाचीअभिव्यक्ती स्वातंत्र्याचीसमाजसुधारणेची धगधगती ज्योत तेवत ठेवत आला आहे. वृत्तपत्रलेखक संघाच्या कार्यालयाला प्रशासनाने टाळे ठोकून जागा रिकामी करण्याच्या नोटीस देत जागा खाली करून घेतली. संस्थेचे अनेक सेवाभावी उपक्रम-कार्यक्रम ठप्प झाले आहेत हि अलीकडची मुख्य चिंता असली तरी  कवी अनिल यांनी ‘पेरते व्हा‘ असा संदेश कविकुळाला दिला त्याच धर्तीवर वाचकांची हि चळवळ ‘पेरते व्हा‘ असा समाजहिताचा संदेश घेऊन वाटचाल करीत आहे अडचणींवर मात करीत पुढे जाणार आहे.

रवींद्र मालुसरे 

अध्यक्ष 

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई

9323117704                     


Back to top button
Don`t copy text!