
स्थैर्य, महाबळेश्वर, दि.१८: महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, मध संचानालय, सरकारी बंगला क्र.5 महाबळेश्वर येथील प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व विविध उपक्रमांचा शुभारंभ शनिवार दि.20 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता उद्योग, खनिकर्म व राजशिष्टाचार, मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते तर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमास गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन राज्यमंत्री शंभुराज देसाई व उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रीडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री आदिती तटकरे यांची विशेष उपस्थितीती असणार आहे.
या कार्यक्रमास खासदार श्रीनिवास पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, प्रधान सचिव डॉ. नीलिमा केरकेट्टा, प्रधान सचिव बलदेव सिंह, जिल्हाधिकारी शेखर सिंह, महाबळेश्वरच्या नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.