राजापूर हायस्कूल येथे १४ फेब्रुवारीला नूतन शालेय प्रवेशद्वार उद्घाटन सोहळा व दानशूर दात्यांचा सत्कार

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. ११ फेब्रुवारी २०२४ | फलटण |
श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे राजापूर हायस्कूल, राजापूर येथे नूतन शालेय प्रवेशद्वार (कमान) उद्घाटन सोहळा व गुणवंत विद्यार्थी आणि दानशूर दात्यांचा सत्कार समारंभ बुधवार, दि. १४ फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी ३ वाजता राजापूर हायस्कूल, राजापूर, ता. खटाव, जि. सातारा येथे होणार आहे.

गुणवंत विद्यार्थी आणि दात्यांचा सत्कार सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, यांच्या शुभहस्ते होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे सचिव श्री. मोहनराव रघुनाथराव जाधव हे असून नूतन शालेय प्रवेशद्वार (कमान ) उद्घाटन श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे अध्यक्ष डॉ. श्री. सुरेशराव जाधव यांच्या शुभहस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगाव हे आहेत.

या कार्यक्रमास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ पुसेगावचे खजिनदार श्री. लक्ष्मणराव जाधव तसेच सर्व संचालक मंडळ व मुख्याध्यापक, शिक्षक-शिक्षकेतर सहकारी, राजापूर हायस्कूलचे शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक संघ, समस्त ग्रामस्थ व पालक राजापूर यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!