
दैनिक स्थैर्य । दि. ०९ जानेवारी २०२३ । फलटण । आय आम ए (इंडियन मेडिकल असोसिएशन) च्या फलटण शाखेच्या नविन कार्यकारीनी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ शनिवारी दि. ७ जानेवारी रोजी फलटण येथे डॅा. जोशी हॅास्पिटल सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला आय एम ए महाराष्ट्र शाखेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे , सचिव डॉ. संतोष कदम तसेच इलेक्शन कमिशनचे चेअरमन डॅा. अविनाश भोंडवे ,माजी स्टेट आयएमए अध्यक्ष व बारामती आय एम ए अध्यक्ष डॉ.अशोक तांबे तसेच डिझास्टर कमीटी चेअरमन व माजी स्टेट आयएमए उपाध्यक्ष डॅा. अमरसिंह पवार, महाराष्ट्र आयएमए चे जॅाईंट सेक्रेटरी डॉ. वैभव चव्हाण व सेंट्रल वर्किंग कमिटीचे अध्यक्ष डॉ. एम आर दोशी यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या बैठकीमध्ये आय एम ए फलटण शाखेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते डॉ. संजय राऊत , उपाध्यक्षपदी डॉ. संपत वाघमारे व डॉ. संतोष गांधी , सचिव या पदासाठी डॉ. सागर माने , उपसचिव या पदासाठी डॉ. जनार्दन पिसाळ व खजिनदार या पदासाठी डॉ.विक्रांत रसाळ , तसेच महिला विंगसाठी उपाध्यक्ष म्हणून डॉ. सौदामिनी गांधी , चेअरमनपदी डॅा. सुनिता पोळ व सचिव पदी डॅा. संजीवनी राऊत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. डॉ. कुटे व इतर मान्यवरांनी नवनिर्वाचित कार्यकारणीला शुभेच्छा दिल्या, तसेच मार्गदर्शन केले आणि फलटण आयएमए शाखा ही महाराष्ट्रामध्ये फलटणचे नाव उंचावेल असा आशावाद व्यक्त केला. या कार्यक्रमास आयएमएचे सर्व लाईफ मेंबर डॉक्टर तसेच नवीन सभासद उपस्थित होते.