वेणेगावात गायरान जमिनीवरून वाद पोलिसांत दोन गुन्हे दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


 

स्थैर्य, नागठाणे, दि.१0: वेणेगाव (ता.सातारा) येथे गायरान जमिनीतील वाहिवटीवरून ग्रामस्थ व वाहिवाटदार यांच्यात वाद सुरू आहे.या वादातूनच शुक्रवारी बोरगाव पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत.गावातील सुमारे पंचवीस जनांसह अज्ञात साठ ते सत्तर लोकांविरुद्ध हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.या वादामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात निवृत्ती बाजीराव काटे,मोहन मारुती घोरपडे,रामचंद्र केरू सावंत,विजयसिंह माधवराव घोरपडे,मानसिंग निवृत्ती काटे,नितीन आनंदा सावंत,सुरेखा आनंदा सावंत,मधुकर विष्णू सावंत,विठ्ठल मारुती सावंत,वैभव पुरुषोत्तम चव्हाण,गणेश संपत चव्हाण,चंद्रकांत लक्ष्मण जाधव,प्रमोद तानाजी सावंत,माणिक जयसिंग सावंत,सचिन अरविंद घोरपडे,संजय जयसिंग सावंत,विशाल आप्पासो सावंत,संजय पंढरीनाथ पवार,अमोल उमेश काटे,रुपेश उर्फ संतोष दिनकर चव्हाण,ज्ञानेश्वर विलास शेळके,बजरंग अनिल काकडे,शिवाजी प्रल्हाद यादव,किशोर जयसिंग चव्हाण (सर्व रा.वेणेगाव,ता.सातारा) यांच्यासह अज्ञात सुमारे६० ते ७० जणांविरुद्ध भा.दं. वि.स कलम १८८,आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र कोव्हिडं विनियमन कलम ११ व साथरोग प्रतिबंधक अधिनियम १९८७ चे कलम ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

सपोनि डॉ.सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय वर्षा डाळींबकर,साहाय्यक फौजदार बाजीराव पायमल,राजू शिंदे व विशाल जाधव यांनी ही कारवाई केली.याची फिर्याद हवालदार सुनील जाधव यांनी दाखल केली आहे.

दुसरी फिर्याद मोहित मानसिंग काटे यांनी दाखल केली आहे.त्यांच्या तक्रारीनुसार चंद्रकांत लक्ष्मण जाधव यांच्याविरुद्घ शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मोहित काटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची वेणेगावात माळ नावाच्या शिवरात गट नं.२७०/१ मध्ये ८० गुंठे जमीन असून ती त्यांचे आजोबा निवृत्ती बाजीराव काटे यांच्या नावावर आहे.या जमिनीच्या सातबाऱ्यावर गावातील ग्रामस्थ गावची सर्व गुरे चारून वर्गणीने आकार भरतात अशी नोंद असून या नोंदीवरून त्यांचा व वेणेगाव ग्रामस्थांचा वाद सुरू आहे.शुक्रवारी सकाळी सातारा तहसीलदार व बोरगाव सपोनि डॉ.सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही गटाच्या ग्रामस्थांची बैठक झाली.

बैठक संपल्यानंतर दुपारी ४.३० वाजण्याच्या सुमारास सालगडी अजित बापू मोरे याने फोन करून सांगितले की चंद्रकांत लक्ष्मण जाधव याने रानातील उसाचे पीक पेटवून दिले असून ऊस पेटवताना त्याने व लक्ष्मण शिवशंकर पवार यांनी पाहिला आहे.या आगीत सुमारे २ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!