निंभोरे गावच्या कुस्ती आखाड्यात जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी गज, सुरा, काठ्यांनी मारहाण; ९ जणांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १९ मार्च २०२३ | फलटण |
निंभोरे गावच्या यात्रेतील कुस्ती आखाड्यात कुस्ती पाहत असताना झालेल्या वादातून जातीवाचक शिवीगाळ करून लोखंडी गज, सुरा, काठ्यांनी मारहाण करण्यात आली व दगडफेक करून जखमी केल्या प्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजय शिवाजी जाधव, निलेश मदने, नितीन मदने, प्रदीप जाधव, शिवाजी जाधव, बापू वाघमोडे, सुरेश पिसाळ, अजय भंडलकर, किरण वसव (सर्व राहणार निंभोरे, तालुका फलटण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, निंभोरे गावचे हद्दीत पालखी वट्याजवळ यात्रेनिमित्त दि. १८ मार्च रोजी सायं. ४.३० वाजण्याच्या सुमारास कुस्ती आखाडा भरविण्यात आला होता. या आखाड्यात फिर्यादी हे कुस्ती पहात असताना ‘कुस्त्या खेळायचे तुमचे काम नाही’, असे आरोपी फिर्यादीस म्हणालेच्या कारणावरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. तेव्हा आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी यांना लोखंडी गज, सुरा व काठी अशा हत्यारांनी मारहाण करून जखमी केले. तसेच फिर्यादीस ‘तुमचे कुस्त्या खेळायचे काम नाही’, असे जातीवाचक बोलून त्यांची मोटरसायकल (क्रमांक एमएच-११-डीएफ-४५७५) वर दगड मारून नुकसान केले असल्याचा जबाब दवाखान्यामध्ये उपचार घेत असताना दिला असून सदरचा गुन्हा एम. एल. सी. जबाबवरून दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी वरील ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!