आगामी निवडणुकीत 45 खासदार भाजपा व मित्रपक्षाचेच असणार : BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. 26 डिसेंबर 2023 | फलटण | भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे आज फलटण दौऱ्यावर आहेत. माढा लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा दौरा आहे. या दौऱ्यात त्यांच्याकडून “घर चलो” अभियान राबवलं जातंय. आगामी लोकसभा निवडणुकीत 45 खासदार हे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांचे असणार आहेत; असा विश्वास यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

फलटण येथे माजी मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे हे पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, आमदार प्रशांत परिचारक, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, तालुकाध्यक्ष बजरंग गावडे यांची प्रमुख उपस्थिती होती. फलटण येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक या दरम्यान व्यापारी आणि नागरिकांबरोबर संवाद आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला.

देशाचे पंतप्रधान कोण पाहिजेत? मोदी सरकारकडून लोकांच्या काय अपेक्षा आहेत. याबाबत चंद्रशेखर बावनकुळे लोकांना प्रश्न विचारत आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीच्यावतीने विविध विकासकामे करण्यात आलेली आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून माढा लोकसभा मतदारसंघात हजारो कोटींचा निधी आणला आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील जनता ही भारतीय जनता पार्टी सोबत आहे; असे मत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केले.


Back to top button
Don`t copy text!