दैनिक स्थैर्य | दि. 07 मार्च 2024 | फलटण | श्री दत्त इंडिया साखरवाडी कारखान्याचा गळीत हंगाम मार्चच्या तिसऱ्या आठवड्याच्या सुमारास बंद होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ऊसाची नोंदणी केली आहे. त्यांनी यादरम्यान आपला ऊस शेती विभागाशी संपर्क करून कारखान्याकडे तोडीस पाठवावा; असे आवाहन कारखान्याचे मुख्य प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कारखान्याचा गळीत हंगाम हा मार्चच्या तिसऱ्या आठवडयाच्या सुमारास बंद होत आहे. तरी कारखाना कार्यक्षेत्रातील व कार्यक्षेत्राबाहेरील सर्व ऊस उत्पादकांना कळविणेत येते की; आपला नोंदीचा ऊस / रस्त्याच्या अडचणीमुळे / कौटुंबिक अथवा इतर कायदेशीर कारणास्तव किंवा अन्य तत्सम कारणाने आपला उभा ऊस शेतात शिल्लक असल्यास अशा सर्व शेतकऱ्यांनी आमच्या कारखान्याचे आपल्या नजीकच्या शेती विभागीय कार्यालयाशी त्वरीत संपर्क साधा. आपला ऊस आपण स्वतः खुद्द तोडणी व वाहतुक करून कारखान्यास सत्वर गळीतास पाठवण्यात यावा.
सदर कालावधीत अशा संबंधीत शेतकऱ्यांकडून वरीलप्रमाणे जरुर ती दखल न घेतल्यास आणि आपला उभा ऊस गाळपा विना शेलात शिल्लक राहिलेस त्याच्या होणाऱ्या नुकसानीस आमचा कारखाना व शासन जबाबदार राहणार नाही. याची कृपया संबंधीत ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कृपया शेती विभाग 9112215003/8956308908/9112215013 या नंबर द्वारे संपर्क साधावा.