दैनिक स्थैर्य । दि. १७ एप्रिल २०२२ । फलटण । मौजे सासकल येथे रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीमध्ये अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. हे या सोहळ्याचे २५ वे वर्ष असून सर्वांनी एकत्र येत अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रम उत्साहात साजरा केला.यामध्ये प्रथेप्रमाणे सकाळी सहा वाजता दिव्यांच्या रोषणाईसह पारंपारिक पद्धतीने पाळणा गाऊन हनुमान जयंती साजरी करण्यात आली.त्यानंतर पालखीची ग्रामप्रदक्षिणा वाद्यांच्या गजरामध्ये ढोल लेझीमच्या निनादात निघाली.ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे पालखीचे स्वागत केले.यामध्ये वीणेकरी व तुळशी वृंदावन घेऊन जाणार्या महिलांचा विशेष समावेश होता.या वेळी ह.भ.प निवृत्ती महाराज झाडगे आळंदी यांचे काल्याचे कीर्तन झाले.विशेष म्हणजे या वेळी हे वर्ष रौप्यमहोत्सवी वर्ष असल्यामुळे संत तुकारामांच्या ” वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ।” हा विचार जपत वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संदेशही देण्यात आला.
या वेळी कै.शांताबाई संभाजी मुळीक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनायक संभाजी मुळीक यांनी महाप्रसादाचे नियोजन दिला.या अखंड हरिनाम सप्ताहासाठी ह.भ.प गजानन नाळे महाराज दुधेभावी हे व्यासपीठ चालक लाभले.त्याचप्रमाणे ह.भ.प साहेबराव डांगे महाराज,कैलास आनंदे महाराज,दीपक पैठणे महाराज,विशाल दिवटे महाराज,रघुनाथ आटोळे महाराज,सीताराम बागल महाराज,किसन पडळकर महाराज,आनंदराव शिंदे महाराज यांनी या अखंड हरिनाम सप्ताहाची सेवा केली.त्यांना या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त रौप्यमहोत्सवी ट्रॉफी, टावेल, टोपी व श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी होण्यासाठी सासकल गावचे सरपंच सौ उषाताई राजेंद्र फुले, माजी सरपंच सोपानराव रामचंद्र मुळीक, लक्ष्मण गणपत मुळीक, रघुनाथ गणपत मुळीक, नामदेवराव दिनकर मुळीक,माजी उपसरपंच दत्तात्रय धोंडिबा दळवी,ग्रामपंचायत सदस्य सोनाली मंगेश मदने,लक्ष्मी रमेश आडके,चांगुणाबाई सर्जेराव मुळीक, मोहन नामदेव मुळीक,लता विकास मुळीक,दिनेश दत्तात्रय मुळीक,अजित पोपट मुळीक (पाटील), निलेश मानसिंग मुळीक,हनुमंत वसंत सावंत,संदीप साहेबराव मुळीक,दत्तात्रय रामचंद्र मुळीक,सदानंद निळकंठ मुळीक,राजेंद्र धोंडिबा घोरपडे, मनोहर संभाजी मुळीक,विकास लक्ष्मण मुळीक, पुष्पापती सुभाष मुळीक,दिलीपराव लक्ष्मण मुळीक,ओमसाई मित्रमंडळ सासकल,अर्जुन तात्या तरुण मंडळ,आदर्शनगर तरुण मंडळ,नेहरू युवा मंडळ सासकल,शिवराज्य नवरात्र उत्सव तरुण मंडळ सासकल पाटी,सासकल जनआंदोलन समिती यांनी विशेष सहकार्य व मेहनत घेतली.