शहरात मात्र कसलीही कोरोनाची धास्ती नसल्याचे बिकट चित्र

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 25 : सातारा जिह्यात कोरोना बाधितांचा आकडा 309 पोहचला आहे. असे असताना शहरात मात्र कसलीही कोरोनाची धास्ती नसल्याचे दिसत आहेत. नागरिक बेधडक, बिनदास्तपणे रस्त्यावर हुंदडत फिरताना दिसत आहेत. काही दुकानदार वगळता व्यावसायिकांकडूनही काळजी घेतली जात नसल्याचे दिसत आहे. काहीजणांच्या तर तोंडाला मास्कही दिसत नाहीत. काहीजणांच्या दुचाकीवरुन डबल सिट फिरताना दिसत आहेत. शहरातील हे बिकट चित्र आहे. त्यामुळे शहरात नियमाला तिलांजली देताना दिसत असल्याने त्यामुळे गर्दी पाहून कोरोनाची भिती होवू लागली आहे.

सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कडक लॉकडाऊन केले होते तेव्हा सातारकर सवलत द्या आम्ही नियम पाळू अशी मागणी करताना दिसत होते. त्यानुसार सातारकरांच्या मागणीचा विचार करुन व शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिह्यात लॉक डाऊन शिथील करण्यात आले. सातारा शहरवासियांनीही सुरुवातीचे दोन दिवस भितभित दुकाने उघडली. पुन्हा आहे ग्राहक आले नाही तरी चालेल पण दुकान उघडे हवे म्हणून मालक स्वतः दुकान उघडून बसू लागले. तर काहींनी दुकान न उघडण्याचा निर्णय घेतला. शहरात पोवईनाका परिसरात कासट मार्केट, मराई कॉम्प्लेक्समधील काही दुकाने उघडली होती. त्या दुकानांमध्ये दुकानदारांनी नियम पाळले होते तर काही दुकानदारांनी नियमाला तिलांजली दिल्याचे दिसत होते.राजवाडा परिसरातील खणआळीत कापडमार्केट सुरु होते. मात्र, तेथेही काही ग्राहक गर्दी करताना दिसत होते. दुचाकी चालवणारे आपल्या दुचाकीवरुन डबलसिट घेवून फिरताना दिसत आहेत.

जिल्हाधिकारी यांच्या सुचनेनुसार सातारा शहरात अनेक जण दुचाकीवरुन डबलसिट व चार चाकीत दोन पेक्षा अधिक लोक बसून प्रवास करताना दिसतात. त्यावर वाहतूक शाखेकडुन प्रभावीपणे कारवाई होताना दिसत नाही. वाहतूक शाखेच्या विभागाची ही चुक असून गेल्या दोन महिन्यात खडा पहारा देणारे वाहतूक जवान किती सांगून थकले परंतु आमचे सातारकरच कोडगे नियम पाळले तर काय होईल, असेही एका बाजूला चित्र आहे.

सातारा बसस्थानकात शुकशुकाट बसेसना तर परवानगी दिली असली तरीही प्रवाशीच नाहीत. त्यामुळे उभ्या असलेल्या बसेस तरीही कशा जाणार?, महामंडळाच्या प्रत्येक आगारांनी जरी आराखडा तयार केला असला तरीही प्रवाशांनीही काळजीपोटी बाहेर पडणेच टाळले आहे. बाहेर पडत असले तर स्वतःचे वाहन काढून बाहेर पडत आहेत. त्यामुळे बसस्थानकात शुकशुकाट जाणवत होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!