स्थैर्य, सातारा, दि. १३: शेती पंपासाठी वीज कनेक्शन घेण्यासाठी पाच हजारांची लाच स्वीकारताना एमएसईबी सेल, शाखा- वाठारच्या कनिष्ठ अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. राहुल अशोक सोनवले, वय -३८ वर्षे, रा. हजारमाची, गजानन सोसायटी, एमएसईबी रोड, कराड असे त्याचे नाव आहे.
याबाबत माहिती अशी, तक्रारदार शेती पंपासाठी नवीन वीज कनेक्शन घेण्यासाठी वाठार, ता कराड येथील एमएसईबी ऑफिसमध्ये गेले होते. याविरोधात तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पडताळणी करून सापळा लावला. पाच हजार स्वीकारताना आरोपी सोनवले यास पथकाने पकडले.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक, अशोक शिर्के, ला.प्र.वि.सातारा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अविनाश जगताप, पो.ना ताटे, पो.कॉ. येवले यांनी केली.