पुसेगाव पोलिसांच्या कारवाईत २ लाख २५ हजार ५५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑगस्ट २०२२ । पुसेगाव । चार चाकी वाहनातून अवैध दारूची वाहतूक करीत असताना पुसेगाव ते बुध या पोलीस स्टेशनच्या हद्दी दरम्यान पुसेगाव पोलिसांच्या छाप्यात देशी दारूच्या बाटल्यासह एकूण 2 लाख 25 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पुसेगाव पोलीस स्टेशन कडून देण्यात आली आहे.

याबाबत पुसेगाव पोलीस स्टेशन सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल व अप्पर पोलीस अधिकारी अजित बोर्‍हाडे व उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांनी दहीहंडी उत्सवाच्या अनुषंगाने पुसेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सक्त पेट्रोलिंग नाकाबंदी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यास अनुसरून दिनांक 18 रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास स.पो.नी संदीप शितोळे यांना गोपनीय माहितीच्या आधारे एक असेंट कंपनीची चार चाकी गाडी (क्र. एमएच 11 वाय 1615) प्रदीप सोमन्ना गौडा वय 35 राहणार पुसेगाव याचे गाडीतून अवैध दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे पुसेगाव ते बुध या रस्त्यावर नाकाबंदी दरम्यान वाहने चेक करत असताना संशयित चारचाकी गाडी बुधकडून पुसेगावकडे येत असताना पुसेगाव हद्दीत नाकाबंदी दरम्यान त्या गाडीची झडती घेत असताना 3500 रुपये किमतीच्या देशी दारूच्या बाटल्या या इसमाकडे सापडल्या. त्या जप्त करण्यात आल्या. अधिक चौकशी केली असता चालक उडवाउडवीची उत्तरे देऊ लागल्याने त्यास ताब्यात घेतले व गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत असेंट कंपनीची चारचाकी गाडी व दारूच्या बाटल्या असा एकूण दोन लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक विपुल भोसले करीत आहेत. या कारवाईमध्ये सपोनी संदीप शितोळे, जगन्नाथ लबाळ, संभाजी माने, पोपट बिचुकले, विलास घोरपडे, सचिन जगताप सहभागी होते.


Back to top button
Don`t copy text!