पळशी येथे परप्रांतीयांचा जिभ कापून खून


दैनिक स्थैर्य । दि. २१ ऑगस्ट २०२२ । माण । माण तालुक्यातील पळशी येथे कुशा चंदर जाधव या कातकरी समाजातील परप्रांतीय कोळसा व्यापाऱ्याचा कुऱ्हाडीने निर्घृणपणे हत्या केल्याची घटना घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कातकरी समाजातील दोन ते तीन कुटुंबे व्यवसायानिमित्त पळशी येथे वास्तव्यास होती. त्यांच्यातील अंतर्गत वादाचे मारहाणीत रुपांतर होऊन कुशा चंदर जाधव नामक व्यक्तीचा कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. ही घटना शनिवार दि. २० ऑगस्ट रोजी दुपारी चारच्या सुमारास घडली आहे. मयत व्यक्तीचा खुन करुन क्रुरपणे जीभ तोडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हल्लेखोर तेथून पसार झाला आहे. हल्लेखोर व मयत दोघेही परप्रांतीय असल्याने अद्याप नावे समजू शकली नाहीत. अधिकचा तपास म्हसवड पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक बाजीराव ढेकळे करीत आहेत.


Back to top button
Don`t copy text!