
दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑगस्ट २०२३ | फलटण |
फलटण शहरातील रविवार पेठ येथे रविवारी सायंकाळी ५.०० वाजण्याच्या सुमारास पूर्ववैमनस्यातून चौघाजणांनी तिघाजणांना कोयता व चाकूने मारहाण केल्याची घटना घडली असून या मारहाणीत तिघेजण जखमी झाले आहेत. या प्रकरणी फलटण शहर पोलिसात राधा सूरज भोसले (रा. शारदानगर, कोळकी, ता. फलटण) यांनी फिर्याद दिली असून चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखिल नंदकुमार पवार, नंदू शिवाजी पवार, वैशाली नंदकुमार पवार (तिघेही रा. भाडऴी बु., ता. फलटण) व गण्या छब्या भोसले (रा. सोमथंळी, ता. फलटण) ही गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
या प्रकरणी अधिक तपास पो.नि. शेळके करत आहेत.