फलटण तालुक्यात आजपर्यंत १९४ करोना पॉझिटीव्ह तर ९३४ जणांचे अहवाल निगेटीव्ह


स्थैर्य, फलटण : फलटण शहर व तालुक्यात दिनांक २३ जुलै २०२० रोजी सायंकाळी ०५:०० वाजेपर्यंत ११८७ जणांच्या घशातील स्रावांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यापैकी १९४ जणांचे अहवाल पॉझीटीव्ह आणि ९३४ जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. तर ५९ जणांचे अहवाल येणे बाकी असल्याचे तसेच पॉझीटीव्ह पैकी ९ आणि निगेटीव्ह पैकी २ जणांचा  मृत्यू झाल्याची माहिती प्रांताधिकारी डॉ. शिवाजीराव जगताप यांनी दिली आहे.

आज (दिनांक २३ जुलै २०२०) रोजी १७८३ जण होम क्वारंटाइन आहेत, करोना केअर सेंटर मधील DCHC मध्ये २४ जण, कन्फर्म वॉर्ड मध्ये ५३ आणि सस्पेक्ट् वॉर्ड मध्ये ११० जण आहेत. आज ३१ जणांच्या घशातील स्रावांचे नमुने घेण्यात आले आहेत, काल २६ अहवाल प्राप्त झाले आहेत त्यापैकी २ जण पॉझिटीव्ह आले आहेत.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!