दैनिक स्थैर्य । दि.१७ फेब्रुवारी २०२१ । फलटण । कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या मंगळवार दि. १५ फेब्रुवारी रोजी झालेल्या साप्ताहिक कांदा मार्केटमध्ये १५१६ पीशवी मध्ये ७५८ क्विंटल हळवा व गरवा कांदा आवक झाली.
गरवा व हळवा कांदा दर प्रति क्विंटल ५०० ते २७०० रुपये निघाल्याची माहिती बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सचिव शंकरराव सोनवलकर यांनी दिली आहे.