म्हसवड येथील रथगृहाजवळ भरत असलेल्या रोज भाजी मंडईचे चित्र. |
स्थैर्य, म्हसवड, दि. २२ : सातारचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी जि.२२ नंतर जिल्ह्यात अंशतहा लॉकडाउन सुरु राहणार असल्याचे जाहीर करुन या काळात फक्त अत्यावश्यक सेवा सुरु राहतील असे जाहीर केले असल्याने दि.२२ पासुन अंशतहा सुरु झालेल्या लॉकडाऊन मध्ये भाजी खरेदीसाठी म्हसवडकर नागरीकांनी मंडईमध्ये खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर म्हसवडकर घराबाहेर पडल्याचे दिसुन आले.
सातारा जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी दि.१७ ते २७ असा लॉकडाउन पुकारला आहे त्यामध्ये पहिले पाच दिवस दि.१७ ते २२ असा कडकडीत लॉकडाउन राहिला व त्यानंतर दि.२२ रोजीपासुन या लॉकडाऊन मध्ये अंशत: शिथिलता देण्यात आली अाहे या काळात भाजी मंडई व किराणा आदींना सवलती देण्यात आली असल्याने अनेक म्हसवडकर व्यापार्यांनी रोज मंडईतच आपली दुकाने थाटुन व्यावसाय सुरु केला आहे. गत ४ महिन्यांपासुन अनेक छोट्या – मोठ्या दुकानदारांवर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली असल्याने अनेकांनी आता परवानगी असलेल्या मंडईतच आपली दुकाने थाटण्यास सुरुवात केली असुन किती दिवस घरी राहणार ? असा सवाल या दुकानदारांकडुन विचारला जात आहे, त्यामुळे नागरीकही आता रोज मंडईतच खरेदीसाठी गर्दी करीत असल्याचे चित्र आहे.