दैनिक स्थैर्य । दि. 03 जानेवारी 2024 । फलटण । मुरूम गावचा ‘क’ दर्जातून ‘ब’ वर्ग दर्जामध्ये समावेश व्हावा यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्याशी चर्चा करून मुरूम गावचा ‘ब’ वर्ग दर्जामध्ये समावेश करण्यासाठी पाठपुरावा केला आहे; त्यामुळे लवकरच मुरूम गावचा ‘ब’ वर्ग दर्जामध्ये समावेश होणार आहे; अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे यांनी दिली आहे.
सुभेदार मल्हारराव होळकर यांचे जन्मगाव असणाऱ्या फलटण तालुक्यातील उद्घाटन सोहळा हा शुक्रवार, दि. ५ जानेवारी रोजी सायं. ६ वाजता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
नीरा नदीवर नव्याने बांधलेला मल्हार घाटासाठी २८ लाख रुपयांचा निधी मंजूर होऊन काम पुर्ण झाले आहे. ग्रामपंचायत इमारतीवर नवीन सभागृह बांधकामासाठी ८ लाख रुपयाचा निधी मंजूर होऊन काम पुर्ण झाले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीसाठी १ कोटी १० लाखाचा निधी मंजूर करण्यात आले होते. मुरूम मधील अंतर्गत रस्त्याच्या कामासाठी १० लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. सुभेदार मल्हारराव होळकर भक्तनिवासासाठी तब्ब्ल ४८ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला होता. गेल्या 30 ते 35 वर्षे रखडलेला रस्त्यांसाठी ३० लाख रुपयांचा निधी वर्ग झालेला आहे. यासोबत खासदार रणजितसिंह यांच्या निधीमधून मुरूम गावामध्ये स्ट्रीट लाईटचे कामकाज पूर्णत्वास गेले आहे.
मुरूम येथील सर्व विकासकामांचा उद्घाटन सोहळा हा शुक्रवार, दि. ५ जानेवारी रोजी सायं. ६ वाजता खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते प्रल्हादराव सोळुंखे – पाटील, युवा नेते धनंजय साळुंखे – पाटील, स्वराज पतसंस्थेचे चेअरमन अमरसिंह नाईक निंबाळकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, भाजपा फलटण तालुकाध्यक्ष बजरंग गावडे, शहराध्यक्ष अमोल सस्ते, साखरवाडीचे माजी सरपंच विक्रम भोसले, माणिक भोसले, मार्केट कमिटीचे माजी संचालक सिराजभाई शेख, वसंतराव ठोंबरे, मुरूम गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत व भारतीय जनता पार्टीचे जिल्हा व तालुका पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे; अशी माहिती मुरूम गावचे पराग बोंद्रे यांनी दिली.