स्थैर्य, वाई, दि.११: नवी मुंबई कामोठे येथील एका व्यक्तीची सुमारे ३१ लाख ५५ हजार रक्कमेची फसवणुक करुन फरारी झालेला आरोपी राज शहा उर्फ गणेश शिंदे हा चांदवडी (ता.वाई ) येथे आले असले बाबतची मिळताच भुईंज पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. राज शहा उर्फ गणेश शिंदे हा चांदवडी (ता.वाई ) येथील भोंदू हा लहानपणापासून ठग आहे. त्याचे शिक्षण मुंबईत झाले.त्याला मराठी,हिंदी,इंग्रजी,गुजराती आदी भाषा येतात.त्या आधारे मुंबईत वकील, डॉक्टर व्यापारी तसेच वाई तालुक्यातील अनवडी, बोपर्डी, दरेवाडी या गावात अनेकांना फसवले आहे.वाई पोलिसांनी त्याच्यावर नुकतीच कारवाई केली होती.जामिनावर बाहेर येताच त्याने पुन्हा आपले उद्योग सुरु केले होते.त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.असे असताना चार दिवसांपूर्वी तो अनवडीत बुवाबाजी करायला आल्याची माहिती मिळताच त्यास तेथील हुसकावुन लावले होते.तो चांदवडी येथील घरी असल्याची माहिती मिळताच त्याला भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे ,पोलिस उपनिरिक्षक भंडारे ,पोलिस शिपाई वर्णेकर,साळुखे यांचे खास पथक तयार करुन शिताफिने पकडले.कामोठे पोलीस ठाणे नवी मुंबई हद्दीत फेब्रुवारी २०२० पासुन सुमारे सुमारे ३१ लाख ५५ हजार रक्कमेची फसवणुक करुन फरारी झालेला होता.पुढील योग्य त्या कायदेशिर कारवाई करीता कामोठे पोलीस ठाण्याचे अधिकारी व पोलीस पथक यांचे ताब्यात देण्यात आले आहे.