दैनिक स्थैर्य । दि. २८ जून २०२३ । सातारा । महाबळेश्वर तालुक्यात शासन आपल्या दारी अभियनांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या शिबिरावेळी तालुक्यातील 1 हजार 320 पात्र लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. पाचगणी येथील अंजूमन स्कूल येथे या शिबीराचे आयोजन कऱण्यात आले होते.
यावेळी वाई-महाबळेश्वर-खंडाळाचे प्रांताधिकारी, महाबळेश्वर तहसिलदार, गट विकास अधिकारी अरुण मरभळ यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
या शिबिरीमध्ये पुरवठा विभागाने 135 लाभार्थ्यांना नवीन नाव, दुबार नाव, नाव कमी करणे, नाव वाढवणे याबाबतची सेवा दिली. सेतु विभागाने 67 लाभार्थ्यांना विविध दाखले दिले. त्यामध्ये डोंगरी, डोमिसाईल, उत्पन्न, जातीचे व ईडब्लुएस या दाखल्यांचा समावेश आहे, संगायो माहिती पुस्तिकांचेही वाटप करण्यात आले. तसेच सात बाराचे उतारे, खाते उतारे, जेष्ठ नागरिक पास, पुनर्वसन दाखले महसूल विभागाकडून देण्यात आले. महसूल विभाने एकूण 546, पंचायत समितीने 539, आरोग्य विभागाने 24, कृषि विभागाने 63, वन विभागाने 25, महाबळेश्वर नगरपालिकेने 96, पाचगणी नगरपालिकेने 5, आरोग्य विभागाने 13 व वीज वितरण कंपनीने 9 अशा एकूण 1 हजार 320 पात्र लाभार्थ्यांना विविध लाभ देण्यात आले.
यावेळी गट विकास अधिकारी श्री. मरभर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शासकीय कार्यलाय प्रमुखांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली.