नोकरीच्या आमिषाने कोरेगाव मध्ये युवकाची फसवणूक तब्बल पाच लाखाला घातला गंडा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ३० सप्टेंबर २०२२ । सातारा । रेल्वे मध्ये नोकरी लावतो व लगेज चे कॉन्ट्रॅक्ट मिळून देतो असे सांगून तब्बल पाच लाख रुपयाचा गंडा घातल्याचे प्रकरण समोर आली आहे याप्रकरणी कृष्णा चंद्रकांत शिंदे व 41 व्यवसाय पिंपरी कॉन्ट्रॅक्टर राहणार देसाई पेट्रोल पंप शेजारी कोरेगाव यांनी कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिरलेली आहे रमण सोमविर कुमार व 39 व्यवसाय नोकरी राहणार रेल्वे क्वार्टर गेट ऑफिसर कॉलनी मिंट रोड दिल्ली यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीच्या तक्रारीनुसार कृष्णा शिंदे व रमण कुमार यांची काही निमित्ताने ओळख झाली होती त्यावेळी गुन्हा दाखल झालेल्या संशयताने शिंदे यांना रेल्वेत नोकरी लावतो व लगेच चे कॉन्ट्रॅक्ट मिळून देतो असे सांगून त्यांच्याकडून रोख चार लाख रुपये व एनईएफटी द्वारे एक लाख रुपये व गुगल पे द्वारे 50 असा 5 लाख 50 हजार रुपये घेतले व रेल्वेचे कोणते कॉन्ट्रॅक्ट न देता व नोकरीत न लावता त्यांची फसवणूक केली फसवणुकीचे हे लक्षात आल्यानंतर शिंदे यांनी कोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे पोलीस उपनिरीक्षक राऊत अधिक तपास करत आहेत


Back to top button
Don`t copy text!