दैनिक स्थैर्य | दि. २३ एप्रिल २०२३ | फलटण |
मलठण (ता. फलटण) येथे लोकनेते हिंदूरावजी नाईक निंबाळकर वारकरी भवन समोर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा लवकरच उभारणार असल्याचे अशोकराव जाधव यांनी सांगितले.
फलटण शहर परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा असावा, अशी फलटणवासियांची बर्याच वर्षापासून इच्छा आहे; परंतु गेले ३० वर्षे एकहाती सत्ता असून सुद्धा जनमताची मागणी पूर्ण करता आलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांची सासरवाडी असणार्या शहरात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची उभारणी लवकरच खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून करणार असल्याचे सांगून अशोकराव जाधव म्हणाले की, फलटण शहराच्या वैभवात भर पडेल असा छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य अश्वारूढ पुतळा लवकरच उभरण्यात येणार आहे.