लोणंद येथील बडवायझर कंपनी बंद अथवा स्थलांतरित केल्यास तीव्र आंदोलन छेडु – साथ प्रतिष्ठानने निवेदनाद्वारे दिला इशारा


स्थैर्य, लोणंद, दि. 20 : लोणंद औद्योगिक क्षेत्रातील बडवायझर कंपनी अंतर्गत वादामुळे बंद होणार अथवा स्थलांतरित होत असल्याची माहिती विविध मार्गाने समजल्याने येथील कामगारांवर मोठे संकट निर्माण होणार आहे.  लोणंद व पंचक्रोशीतील अनेक नागरिक बेरोजगार होऊन उपासमारीला सामोरे जावे लागणार असल्याने तसेच अशा कंपन्या बंद झाल्या तर शहरातील आर्थिक परिस्थितीवर पण ताण निर्माण होऊ शकतो. याकारणे साथ प्रतिष्ठाणचे वतीने आज बडवायझर कंपनी व्यवस्थापनास कंपनी बंद अथवा स्थलांतरित केल्यास कामगारांचे हितार्थ तीव्र आंदोलन छेडु असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.

यावेळी साथ प्रतिष्ठाणचे अध्यक्ष कय्युम मुल्ला यांनी सचिव मंगेश माने, खजिनदार सचिन चव्हाण, कार्याध्यक्ष स्वप्नील बुरुंगले, संतोष राऊत तसेच कामगार वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!