
दैनिक स्थैर्य | दि. 13 ऑक्टोबर 2021 | फलटण | भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहरातील रस्ते हे खराब झालेले आहेत. तरी आगामी काळामध्ये रस्ते करताना फलटण शहरातील रस्ते हे दर्जेदारच करावेत, रस्त्यांच्या बाबतीत झालेला हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. असे स्पष्ट निर्देश सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिले.
फलटण शहरामधील विविध रस्त्यांचे भूमिपूजन कार्यक्रम हे सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी आमदार दीपक चव्हाण, नगराध्यक्षा सौ.निता नेवसे, ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांच्यासह पालिकेचे नगरसेवक यांची प्रमुख उपस्थिती होती.
शहरातील जवळपास सर्वच प्रभागांमधील विविध रस्त्यांची कामे फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. तरी आगामी काळामध्ये सर्वच रस्त्यांची कामे ही दर्जेदारच होतील, अशी खात्री आपल्या सगळ्यांना आहे, असे मत फलटण कोरेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.
विधान परिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली व श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण शहरामध्ये विविध विकास कामे प्रगतीपथावर चालू आहेत. आगामी काळामध्ये फलटण शहरांमधील सर्वच्या सर्व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्यात येणार आहेत, असे मत फलटण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सौ. नीता मिलिंद नेवसे यांनी यावेळी व्यक्त केले.
– भूमीपूजन होणार्या रस्त्यांचा प्रभागनिहाय तपशील खालीलप्रमाणे –
– प्रभाग क्रमांक 2 –
1) पेठ मंगळवार पंढरपूर रोड ते श्री.युवराज अहिवळे घर ते पटेल पिछाडी पर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.
2) पेठ मंगळवार सार्वजनिक शौचालय पाठीमागील बाजू ते मेहत्तर कॉलनी भिंत रस्ता करणे.
– प्रभाग क्रमांक 6 –
1) पेठ शुक्रवार चांदतारा मस्जिद पिछाडी ते नसरुद्दीन शेख घर रस्ता करणे.
2) पेठ शुक्रवार मानकेश्वर मंदिर ते अभिजित जानकर घर रस्ता करणे.
3) पेठ शुक्रवार वेलणकर दत्त मंदिर ते चाँदतारा मस्जिद पर्यंत रस्ता करणे.
4) पेश शुक्रवार मस्जिद ते सावकार घरापर्यंत रस्ता करणे.
5) पेठ शुक्रवार सावकार घर ते चावडी पर्यंत रस्ता करणे.
6) पेठ शुक्रवार चावडी ते मारुती मंदिर रस्ता करणे.
– प्रभाग क्रमांक 7 –
1) मेटकरी गल्ली घाडगेवाडा ते सोनार मॅडम घर रस्ता करणे.
2) क्रांतीसिंह उमाजी नाईक चौक ते परिवार साडी सेंटर ते पेठ रविवार तालीम रस्ता, परिवार साडी सेंटर ते पोतेकर घर ते बारामती चौकाकडे जाणारा रस्ता.
– प्रभाग क्रमांक 10 –
1) सणगर गल्ली अंडीवाले बोळ ते श्रीकृष्ण मंदिर पिछाडी रस्ता करणे.
2) पेठ कसबा जयहिंद कोल्ड्रींक्स ते डॉ.जगताप दवाखाना रस्ता करणे.
3) पेठ कसबा ह.बा.कुलकर्णी घर ते रवि शिंदे गिरणी पर्यंत रस्ता करणे.
4) रंगारी महादेव परिसर कदम घर ते राजेंद्र मठपती घर रस्ता करणे.
5) रंगारी महादेव परिसर माने घर ते कानसाळे घर रस्ता करणे.
6) रंगारी महादेव परिसर बाजारे गुरुजी ते पारडेकर मठ पर्यंत रस्ता करणे.
7) रंगारी महोदव परिसर अवस्थान मंदिर ते गणदास घर रस्ता करणे.
8) श्रीकृष्ण मंदिर पिछाडी भोरी स्मशान भुमी ते डॉ.गुंगा घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.
9) पेठ बुधवार डॉक्टर राजवैद्य पिछाडी रस्ता करणे.
– प्रभाग क्रमांक 11 –
1) स्वामी विवेकानंद नगर डॉ.बिचुकले बंगला ते शिवनेरी अपार्टमेंट पर्यंत रस्ता करणे.
2) स्वामी विवेकानंद नगर गौरवबुवा शेवळीकर ते नगरपरिषद ओपनस्पेस पर्यंत रस्ता करणे.
3) कॉलेज रोड मारुती मंदिर ते महादेव मंदिर रस्ता करणे.
4) कॉलेज रोड महादेव मंदिर ते कॉलेज रस्ता करणे.
– प्रभाग क्रमांक 12 –
1) गोळीबार मैदान, उमेश निंबाळकर घर ते शाळा कंपाऊंड पर्यंत रस्ता करणे.
2) रिंगरोड ते खान घर ते अभंग हॉस्पिटल रस्ता (आदिती गार्डन जवळ) करणे.