दैनिक स्थैर्य । दि. १९ जुलै २०२३ । मुंबई । ओम्नीचॅनेल आता फक्त चर्चेचा शब्द राहिलेला नाही, ते वास्तविकता बनले आहे आणि उद्योगांमधील व्यवसायांना डिजिटल माध्यम व डिवाईसेसवर एकसंधी व युनिफाईड ग्राहक परस्परसंवाद देणे उत्तम मार्ग असल्याचे समजले आहे. फिनटेक क्षेत्र या डिजिटल क्रांतीमध्ये अपवाद नाही. खरेतर फिनटेक किंवा आर्थिक तंत्रज्ञान डिजिटल क्रांतीला त्यांच्या उदयाचे श्रेय देतात. ज्यामुळे फिनटेक्स विकासासाठी डिजिटल विक्री माध्यमांचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असण्याबाबत आश्चर्य करण्यासारखे नाही.
एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर श्री. प्रभाकर तिवारी यांनी सांगितले की, डिजिटल विक्री म्हणजे ज्यामध्ये कंपन्या त्यांच्या सेवांची विक्री करण्यासाठी डिजिटल माध्यमांचा उपयोग करतात. फिनटेक कंपन्या किंवा फिनटेक-समर्थित ब्रॅण्ड्सच्या संदर्भात याचा अर्थ ग्राहक ट्रेडिंग व्यासपीठाच्या ऑफरिंग्जचा लाभ घेण्यासाठी कशाप्रकारे कंपनीच्या अॅपचा उपयोग करू शकतात. डिजिटल विमा अॅप्स, ट्रेडिंग अॅप्स, बँकिंग अॅप्स हे सर्व ग्राहकांना सुविधांचा लाभ घेण्याची आणि नवीन सेवांचा अवलंब करण्याची मुभा देतात.
व्हॉट्सअॅपची क्षमता: दोन बिलियन युजर्ससह जगभरात व्हॉट्सअॅपच्या वाढत्या वापरासह फिनटेक्स त्यांच्या ग्राहकवर्गापर्यंत पोहोचण्यासाठी मेसेजिंग अॅपच्या क्षमतांना नाकारू शकत नाहीत. २०२१ टेकक्रंच न्यूज रिपोर्टच्या मते, १७५ दशलक्षहून अधिक व्यक्ती दररोज मेसेजिंग अॅपच्या माध्यमातून व्यवसायांपर्यंत पोहोचतात. क्यूआर कोड्स किंवा प्रॉडक्ट कॅटलॉग्स अशा वैशिष्ट्यांच्या वापराने व्यवसायांना विक्रीला चालना देण्यास मदत होते. फिनटेक कंपन्या व्हॉट्सअॅप चॅटबोट्सचा देखील वापर करतात, जे ग्राहकांना प्रत्यक्ष त्यांच्या एफएक्यूसाठी आपोआपपणे प्रतिसाद देऊ शकतात आणि चौकशींचे निराकरण करण्यामध्ये मदत करू शकतात.
चॅटबोट्स फिनटेक क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण डिजिटल विक्री माध्यमासाठी महत्त्वाच्या आहेत. पेमेंट अॅप्स, बँकिंग अॅप्स व वेबसाइट्स, ट्रेडिंग प्लॅटफॉर्म्स/अॅप्स चॅटबोट्सचा वापर करत कस्टमर सपोर्ट देतात, सहभागाला चालना देतात किंवा खरेदी सेवांसह मदत करतात.
ऑनलाइन मार्केटप्लेस मॉडेल: तसेच, फिनटेक्सनी डिजिटल विक्री माध्यम म्हणून ऑनलाइन मार्केटप्लेस मॉडेलचा देखील फायदा घेतला आहे. उदाहरणार्थ, फिनटेक लेण्डिंग मार्केटप्लेस, जे ग्राहकांना कर्ज, व्याजदर यांची तुलना करण्याची सेवा देते किंवा इन्व्हेस्टमेंट्स मार्केटप्लेस, जे ग्राहकांना आघाडीच्या फंड हाऊसेसमधील विभिन्न म्युच्युअल फंड्सची तुलना करण्याची सेवा देते.
सामाजिक व्यापार: तुम्ही विचार करत असाल की सोशल मीडिया फक्त धमाल व गेम खेळण्यासाठी असते, तर पुन्हा एकदा विचार करा. फेसबुक, यूट्यूब व इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया व्यासपीठांनी व्यवसायांसाठी डिजिटल विक्री माध्यम म्हणून दुप्पट प्रगती केली आहे. २०२२ मधील सेल्सफोर्सच्या ‘स्टेट ऑफ द कनेक्टेड कस्टमर’ अहवालानुसार भारतात सर्वेक्षण करण्यात आलेल्यांपैकी ७१ टक्के प्रतिसादक म्हणाले की, त्यांना आगामी तीन वर्षांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून खरेदी करण्याची अपेक्षा आहे, तर ७७ टक्के प्रतिसादक म्हणाले की, ते कॉन्टॅक्टलेस पेमेंट्सचा वापर करतील. यामधून विकासाला चालना देण्याकरिता डिजिटल विक्री माध्यम म्हणून सोशल मीडियाची वाढती लोकप्रियता दिसून येते. फिनटेक्सनी सर्वसमावेशक आर्थिक कन्टेन्ट निर्माण करण्यासाठी यूट्यूब व सोशल मीडिया व्यासपीठांचा वापर केला आहे, ज्यामध्ये फक्त सहभागासोबत रूपांतरणासाठी ट्रेडिंग, म्युच्युअल फंड्स किंवा विमा यावरील व्हिडिओ ‘कसे करावे’ यांचा समावेश आहे.
फिनटेक्स विकास व विस्तारीकरणासाठी डिजिटल विक्री माध्यमांचा कशाप्रकारे वापर करत आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे भारतातील डिमॅट खात्यांची वाढती संख्या. एप्रिल २०२३ मध्ये भारतातील डिमॅट खात्यांची संख्या ११६ दशलक्षांपर्यंत वाढली, ज्यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत २६ टक्क्यांची वाढ झाली. या वाढीसाठी मोठे कारण म्हणजे अॅप-आधारित ट्रेडिंग व्यासपीठांनी खाती उघडणे आणि व्हॉट्सअॅप अशा विविध डिजिटल माध्यमांवर, त्यांच्या वेबसाइट्सवरील किंवा अॅप्सवरील चॅटबोट्स किंवा लाइट्स चॅट्सच्या माध्यमातून विविध सेवा खरेदी करणे सुलभ केले आहे.
सारांश: अलिकडील अहवालांच्या मते, ८७ टक्क्यांच्या अवलंब दरासह भारतातील फिनटेक क्षेत्र जागतिक सरासरी ६४ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. फिनटेक अवलंबतेमधील वाढ विकासासाठी डिजिटल विक्री माध्यमांचा विस्तार करण्यामधील वाढीशी संलग्न आहे.