
परकीय भूमीत प्रवास करणे हा एक अविस्मरणीय अनुभव ठरतो. नवीन संस्कृती, खाद्यजीवन, प्रेक्षणीय स्थळे आणि भरपूर काही अनुभवण्याची संधी प्राप्त होते. प्रवासामुळे नवीन दृष्टीकोन मिळतो. आपलं व्यक्तिमत्व बहुआयामी बनण्यास वाव मिळतो आणि समृद्ध जीवनानुभव प्राप्त होतो. परदेशी प्रवासादरम्यान व्हिसा ते तिकीट, निवास ते प्रवासाची आखणीपर्यंत बारकाईने नियोजनाची आवश्यकता भासते. परदेशी ट्रिपदरम्यान सर्वाधिक गांभीर्याची बाब म्हणजे ‘ट्रॅव्हल इन्श्युरन्स’ होय. मात्र, बहुतांशजण याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचे आपल्याला दिसते. खरंतर सर्वोत्तम ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला ट्रिपदरम्यानच्या संभाव्यजनक विविध आपत्तींपासून संरक्षण प्रदान करतो. जेणेकरुन तुम्हाला चिंतामुक्त सुट्टीचा आनंद घेता येऊ शकतो. पुढील काही परिच्छेदातून मी ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे विविध लाभ आणि कव्हरेजची व्याप्ती स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे.
मेडिकल इमर्जन्सीपासून इन्श्युअर्डचे संरक्षण
परदेशात आपत्कालीन इमर्जन्सीला सामोरं जाण्याची कल्पनाच मनात धडकी भरवते. अनोळख्या ठिकाणी अशी समस्या निर्माण होण्यामुळे केवळ ट्रिपचेच नुकसान होत नाही. तर खिश्यावर मोठा आर्थिक ताण निर्माण होतो. अशा स्थितीत ट्रॅव्हल इन्श्युरन्स प्लॅन निश्चितच तुमच्यासाठी संकटमोचक ठरतो. तुमच्या आजारणाचा खर्च, रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीचा आणि नंतरचा खर्च तसेच वैद्यकीय प्रत्यावर्तनाचा खर्च हा हेल्थ इन्श्युरन्समधून कव्हर केला जातो. जर तुम्हाला तातडीने एखादी शस्त्रक्रिया किंवा उपचार घ्यावे लागल्यास अशा स्वरुपाचा खर्चदेखील यामध्ये कव्हर केला जातो. वैद्यकीय अत्यावश्यकतेच्याशिवाय पॉलिसी अपघातांनादेखील कव्हर करते.
फ्लाईट डीले कव्हरेज
जर कोणत्याही कारणास्तव, पॉलिसीत नमूद किमान तासांपेक्षा अधिक विमानास विलंब (डीले) झाल्यास, तुम्हाला विलंबामुळे सहन कराव्या लागलेल्या विविध खर्चासाठी पॉलिसीद्वारे कव्हरेज प्रदान केले जाते. यामध्ये रिफ्रेशमेंट्स, फूड किंवा अन्य आवश्यक खर्चांचा अंतर्भाव होतो. मात्र, तुम्हाला रिएम्बर्समेंट दाखल करताना संबंधित बिले सादर करणे गरजेचे असेल.
डीले किंवा चेक-इन सामान गहाळसाठी कव्हरेज
प्रवासादरम्यान तुमची बॅग गहाळ होणे ही कदाचित सर्वाधिक वाईट बाब असू शकते. ज्यामुळे केवळ तुमच्या ट्रॅव्हल प्लॅनवर परिणाम होत नाही. तर तुम्हाला मौल्यवान वेळदेखील गमवावा लागू शकतो. सर्वात महत्वाची संभाव्य शक्यता म्हणजे सामानाला विलंब होणे. कल्पना करा, ीन शहरात तुमचे लँडिंग झाले आहे आणि शहर पाहण्यासाठी तुम्ही आतुर झाला आहात. पण अजूनही तुमचं सामान तुमच्यापर्यंत पोहोचलं नसेल तर? चिंता नको. तुमचं सामान मिळण्यासाठी तुम्हालाकाही तासांपासून काही दिवस लागू शकतात. तुमचा ट्रॅव्हल इन्श्युरन्स तुम्हाला अशा स्थितीत कव्हरेज प्रदान करेल. जेणेकरुन सामान मिळण्यास झालेल्या विलंबामुळे तुम्हाला खरेदी कराव्या लागलेल्या आवश्यक वस्तूंच्या खर्चाचे पॉलिसीद्वारे रिएम्बर्समेंट केले जाईल.
पासपोर्ट गहाळ होणे
परदेशात पासपोर्ट गहाळ होणं यासारखी दुसरी चिंताजनक बाब असू शकत नाही. परदेशी प्रवासात पासपोर्ट हे एकमेव अत्यंत महत्वाचे डॉक्युमेंट्स मानले जाते. यामुळे काही अडचणी आणि खर्चालादेखील सामोरे जावे लागते. ट्रॅव्हल इन्श्युरन्सद्वारे ड्युप्लिकेट पासपोर्ट मिळविण्यासाठी येणार्या खर्चाला कव्हर केले जाते.
ट्रिप कॅन्सलेशन आणि वेळेपूर्वीच आटोपणे
जर कोणच्याही गंभीर कारणांमुळे जसे की, जवळच्या नातेवाईकांचे निधन किंवा अपघात, वैयक्तिक आरोग्य समस्या किंवा अन्य कोणतेही कारणामुळे तुमची ट्रिप रद्द किंवा नियोजित वेळेपूर्वीच आटोपावी लागल्यास तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. हॉटेल बुकिंग्स आणि विमान तिकिटे यासारख्या नॉन-रिफंडेबल, प्री-पेड खर्चासाठी पॉलिसीद्वारे रिएम्बर्समेंट केले जाते. तुमच्या पॉलिसीमध्ये ट्रिप कॅन्सलेशनच्या स्थितीत रिएम्बर्स केल्या जाणार्या खर्चाची आणि रिएम्बर्स्डसाठीच्या पात्र स्थितींची यादी असते.
या स्टँडर्ड कव्हर्स व्यतिरिक्त काही उपयुक्त अॅड-ऑन्स कव्हर्स जसे की, वैयक्तिक वस्तू गहाळ होणे जसेकी लॅपटॉप, मोबाईल, डॉक्युमेंट्स आणि अॅडव्हेंचर्स स्पोर्ट्सदेखील उपलब्ध आहेत. काही राष्ट्रात जसेकी शेंगेन राष्ट्रे या ठिकाणी प्रवास करताना ट्रॅव्हल इन्श्युरन्स अनिवार्य असल्याचे आपण लक्षात ठेवायला हवे.
तुम्हाला या लेखातून ट्रॅव्हल इन्श्युरन्सचे महत्त्व आणि प्रवासादरम्यान तुम्हाला कोणतीही दुर्दैवी घटना घडल्यास ते कसे उपयोगी पडू शकते हे समजून घेण्यात नक्कीच मदत झाली असेल. म्हणून, पुढील ट्रिपचा प्लॅन आखताना चिंतामुक्त ट्रिपसाठी ट्रॅव्हल इन्श्युरन्स पॉलिसी खरेदी करण्यास विसरू नका.
– श्री. आदित्य शर्मा, मुख्य वितरण अधिकारी – रिटेल सेल्स, बजाज आलियान्झ जनरल इन्श्युरन्स