
दैनिक स्थैर्य । दि. १३ जून २०२३ । मुंबई । ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचनादीदी यांच्या अस्थी कलशाचे विसर्जन मंगळवारी दीदींच्या कन्या कांचनताई घाणेकर यांच्या हस्ते वरळी येथे समुद्रात करण्यात आले. यावेळी सुलोचनादिदींच्या कुटुंबाचे घनिष्ठ स्नेही भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आवर्जून उपस्थित होते. अस्थीविसर्जन हे श्री. तावडे यांच्या उपस्थितीतच व्हावे, या दीदींच्या कुटुंबियांच्या इच्छेखातर श्री. तावडे खास दिल्लीहून मुंबईमध्ये आले. याप्रसंगी त्यांनी सुलोचनादीदींना श्रद्धांजली वाहिली. सुलोचनादीदींच्या अस्थींच्या एका कलशातील अस्थींचे विसर्जन दीदींची कर्मभूमी कोल्हापूर येथे करण्यात आले.