दैनिक स्थैर्य । दि.०८ जानेवारी २०२२ । फलटण । फलटण तालुका कृषी विभागाच्या मार्फत फलटण तालुक्यातील सासकल येथे डाळिंब या फळपिकावरील शेतीशाळेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. विडणी मंडळ कृषी अधिकारी अमोल सपकाळ यांनी प्रात्यक्षिकांवर आधारित कृषी तंत्रज्ञानाची माहिती यावेळी दिली.
सातारा तालुक्यातील बोरगाव येथील कृषि विज्ञान केंद्राच्या डॉ. स्वाती गुरवे यांनी डाळींब पिकावरील कीड व रोग नियंत्रण बाबत सविस्तरपणे माहिती दिली. सध्या मका पिकाचे क्षेत्र वाढत असून मका पिकावर प्रादुर्भाव वाढत असलेल्या मका पिकांवरील लष्करी अळी नियंत्रण व रबी हंगामातील हरभरा घाटे अळी बाबत सुद्धा डॉ. गुरव यांनी माहिती दिली.