आयएमएफची रिपोर्ट : या वर्षी देशाच्या जीडीपीत 10.3 घसणर होणार, तर 2021 मध्ये 8.8 टक्के वाढ होईल

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 

स्थैर्य, दि.१४: इंटरनेशनल मॉनेटरी फंड (IMF) ने मंगळवारी सांगितले की, भारताच्या जीडीपीत या वर्षी 10.3% घट होईल, तर 2021 मध्ये 8.8% होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी जूनमध्ये आयएमएफने 4.5% घट होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. कोरोना महामारी आणि देशातील लॉकडाउनमुळे जीडीपीत घट होत आहे.

इमर्जिंग मार्केट आणि डेव्हलपिंग इकोनॉमीमध्ये घट होण्याची शक्यता

आयएमएफने आपल्या बाय-एनुअल वर्ल्ड इकोनॉमी आउटलुकमध्ये म्हटले की, या वर्षी सर्व इमर्जिंग मार्केट आणि डेव्हलपिंग इकोनॉमी क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. यात विशेषतर भारत आणि इंडोनेशियासारख्या मोठ्या इकोनॉमी सामील आहेत. भारताच्या संदर्भात, आयएमएफने दुसर्‍या तिमाहीत जीडीपीवरील पूर्वीचा अंदाज बदलला आहे. या अंदाजानुसार, 2020 मध्ये अर्थव्यवस्थेत 10.3% घट होण्याची शक्यता आहे.

यावर्षी जागतिक विकासात घसरण होण्याची शक्यता

आयएमएफ आणि वर्ल्ड बँकेच्या वार्षीक मीटिंगपूर्वी जारी रिपोर्टनुसार, जागतिक विकासात यावर्षी 4.4 टक्के घट होऊ शकते. परंतू, हे पुढच्या वर्षी 2021 मध्ये 5.2 टक्क्यासोबत बाउंस बॅक होऊ शकते. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल अंदाज आहे की, हे 2020 मध्ये 5.8 घट होऊ शकते, तर पुढच्या वर्षी 3.9 टक्के वाढ होऊ शकते.

मोठ्या अर्थव्यवस्थांच्या बाबतीत, चीनच्या जीडीपी बद्दल फक्त एक सकारात्मक अंदाज आहे. चीनचा जीडीपी 2020 मध्ये 1.9 टक्के वाढू शकतो. आयएमएफने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अंदाजांचे पुनरावलोकन फक्त भारताबद्दल आहे, जिथे जीडीपी दुसऱ्या तिमाहीत अंदाजापेक्षा जास्त घट झाली आहे.

2019 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 4.2% होता

रिपोर्टनुसार, 2019 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 4.2% होता. गेल्याच आठवड्यात आयएमएफने म्हटले की या आर्थिक वर्षात भारताची जीडीपी 9.6 टक्क्यांनी घसरू शकेल. सध्या भारताची परिस्थिती खूपच वाईट आहे, जी आपण यापूर्वी कधीच पाहिली नव्हती.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!