बादशाही मस्जिद मर्कज ट्रस्टकडून ‘रमजान ईद’ निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन


दैनिक स्थैर्य | दि. १८ एप्रिल २०२३ | फलटण |
पवित्र सन ‘रमजान ईद’ निमित्त इफ्तार पार्टीचे बादशाही मस्जिद मर्कज ट्रस्ट फलटणचे चेअरमन तथा माजी नगरसेवक वस्ताद सलिमभाई बाबुमिया शेख व ट्रस्ट पदाधिकारी यांच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आमदार दीपकराव चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, माजी नगरसेवक किशोरसिंह नाईक निंबाळकर, बाळासाहेब मेटकरी, राहुलभैय्या निंबाळकर, अमोल भोईटे, जॉनीभैय्या पलंगे, मयूर गुंजवटे व मान्यवरांनी इफ्तार पार्टीस उपस्थित राहून मुस्लिम बांधवाना पवित्र सन ‘रमजान ईद’च्या शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी बादशाही मस्जिद मर्कज ट्रस्ट, फलटणचे पदाधिकारी व मुस्लिम बांधव उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!