दैनिक स्थैर्य | दि. १ सप्टेंबर २०२३ | फलटण |
युवकांना ध्येयाची जाणीव करून दिल्यास त्यांच्या जीवनाची दशा होणार नाही. तरुणाई भरकटण्यापासून सावरण्यासाठी आपला सांस्कृतिक वारसा जतन करावा, असे विचार श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कनिष्ठ महाविद्यालयाचे कथाकार, प्रबोधनकार प्रा. रवींद्र कोकरे यांनी मांडले.
प्राथमिक, माध्यमिक आश्रमशाळा सांगवी (ता. फलटण) येथे युवा छायाचित्रकार हर्षल लोखंडे यांचा वाढदिवस शालेय साहित्य, ग्रंथ, फळे, वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. त्यावेळी प्रा. कोकरे बोलत होते. या अनोख्या उपक्रमास अंकुश शिंदे सर, दत्तात्रय काळे, गणेश गवळी, मारूती शिर्के गुरूजी, युवराज खलाटे, शिवमूर्ती लोखंडे, पोपट शिंदे गुरूजी, पार्थ तावरे, कल्पना लोखंडे, मित्र परिवार, आश्रम शाळेतील शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
केक कापून व बीभत्स उत्साही स्वरूपाने वाढदिवस साजरा न करता गरजू, अनाथ, वंचित मुलांच्या सहवासात फल छेदन करून साजरा करणे काळाची गरज आहे, असे प्रा. रवींद्र कोकरे यावेळी म्हणाले. या आगळ्या-वेगळ्या चळवळीचे कौतुक सगळीकडे होत आहे.
प्रास्तविक अंकुश शिंदे सर यांनी केले. स्वागत माध्यमिक आश्रशाळेचे मुख्याध्यापक गणपत नाळे, सूत्रसंचालन प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक पांडुरंग येवले, तर आभार गडकरी सरांनी मानले.