स्थैर्य, खटाव, दि. 25 : धोंडेवाडी ता खटाव येथे बांधकाम व्यवसाय करण्यासाठी छत्तीसगड राज्यातील सुमारे पंधरा पुरुष महिला मजूर आले होते. बांधकामास सुरुवात होण्याअगोदरच लॉकडाऊन जाहीर झाले. सध्या या मजुरांच्या हाताला काम ही नाही अन पोटाला खायला अन्न नाही. आशा हलकीच्या परिस्थितीत त्यांनी परत गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ट्रेन व इतर तांत्रिक अडचण मोठ्या प्रमाणावर येत आहेत. त्यामुळे इकडे भुकेने मारण्यापेक्षा गावाकडे जाऊन मरण आले तर आई वडील व इतर नातेवाईकांना अंत्यदर्शन तरी घेता येईल अशी संतप्त प्रतिक्रिया या मजुरांकडून व्यक्त होत आहे.
सदरचे कामगर गेले दोन महिने लॉक डाऊन मुळे अडकून पडले आहेत. या कामगारांमध्ये पाच ते सहा पुरुष आठ महिला व सहा लहान बाल्कनाचा समावेश आहे. ते सर्व जण धोंडेवाडी येथून वडूज तहसिल कार्यलयापर्यंत चालत आले आहेत. त्यांनी कार्यालयाच्या आवारातील पिटीशीयन रायटर च्या बराकीत आपला मुक्काम ठोकला आहे. या ठिकाणी शिवभोजनच्या माध्यमातून त्यांची जेवणाची सोय होत आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची व अंघोळची गैरसोय आहे. तसेच उन्हाळ्याचे दिवस व पत्र्याच्या शेड मध्ये लहान मुलांना उकड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. झोपलेल्या चिमुकल्यांना साडीच्या पदराने माउलीला वारा घालावा लागत आहे. शासकीय इतमामाने घरी जाण्यासंदर्भात कधी उपाययोजना होईल हे सांगता येत नाही. या कामगारांना धड लिहता वाचता येत नाही. शिवाय मराठी बोलता येत नाही त्यामुळे ते पूर्णपणे वैतागून गेले आहेत. तर महसूल व पोलीस प्रशासन सांगतय की त्यांची ट्रेन रद्द झाली आहे त्या मजुरांनी पुन्हा धोंडेवाडीतच जावे. त्यांची सर्व प्रकारची राहण्या जेवणाची व्यवस्था करण्यासंदर्भात गाव कामगार तलाठ्यांना सूचना देण्यात अली आहे. अशा परिस्थितीत आता त्या कामगारांना आपल्या चिमुकल्यांना सोबत घेऊन धोंडेवाडीला जायचे म्हटले तर पुन्हा सुमारे ३० किलोमीटर ची पायपीट करावी लागणार आहे.या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना मुकादम जुगणु पात्रे म्हणाले हमे मराठी नहीं आती… हम पढे लिखे नहीं… मुंगेली(छत्तीसगड) से बांधकाम के लिए एक काँट्रॅकटर के साथ आये थे.. ओ काँट्रॅकटर हमे यहा छोडकर वापस चला गया… यहा आने के बाद दो दिन मे लॉक डाऊन हो गया उधर कोई काम ही नही तो दाम और अनाज का सवाल ही नही है . यहा भुका मरने के पाहिले हमारे गाव जाकर मरे तो अछा होगा. उधर माँ बाप और घर वाले तो अंत्यदर्शन लेंगे…. अशी संतप्त भावना त्यांनी व्यक्त केली.