लॉकडाऊन काढला नाही, तर लोक गप्प बसणार नाहीत – उदयनराजे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा, दि. 03 : देशात वाढवलेल्या लॉकडाऊनवर उदयनराजेंनी टीका केलीय. “लॉकडाऊन कधी उठणार? लॉकडाऊन काढला नाही, तर लोक गप्प बसणार नाहीत,” असं भाजपचे राज्यसभेतील खासदार उदयनराजे भोसले म्हणाले.

लॉकडाऊनमुळे लाखो लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे लॉकडाऊन किती वाढवणार? असा प्रश्न उदयनराजेंनी विचारला.

“आगोदरच कोरोनामुळे जगात वातावरण विस्कळीत झालंय. आर्थिक परिस्थिती पाहिली तर चोऱ्यामाऱ्या सुरू होतील, अशी स्थिती आहे. ते काही स्वखुशीने नाही तर पर्याय नसल्याने घडेल.

ही परिस्थिती कंट्रोल करण्यासाठी आपल्याकडे पोलिसांची कुवत पुरेशी नाहीय. जे कोणी सत्तेत असतील त्या प्रमुख मंडळींनी एकत्र बसून यावर तात्काळ तोडगा काढावा,” असा सल्लाही उदयनराजेंनी दिला आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!